Solapur: नातेपुते नगरपंचायत आरक्षणाची सोडत जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नातेपुते नगरपंचायत

नातेपुते नगरपंचायत आरक्षणाची सोडत जाहीर

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते नगरपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज दुपारी उपविभागीय अधिकारी (मंगळवेढा) आप्पासाहेब समिंदर यांच्या नियंत्रणाखाली व नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काढण्यात आली. यावेळी अनेक इच्छुकांच्या प्रभागात सोयीचे आरक्षण पडल्यामुळे त्यां चेहऱ्यावर हसू होते तर काहींच्या चेहऱ्यावर चिंताही दिसून येत होती. हक्काच्या प्रभागात महिलांचे व इतर आरक्षण पडल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. आता प्रत्येक जण आपापल्या प्रभागाची मतदार यादी घेऊन आपल्याला सोईचा प्रभाग कोणता याचे गणित मांडण्यात मग्न झालेले दिसून येतात.

आजच्या सोडतीवेळी 12 रोजी झालेल्या सोडतीतील अनुसूचित जातीच्या तीन जागा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये यापूर्वी पाच जागा होत्या. त्या राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार चार जागा देण्यात आलेल्या आहेत. पिक्षा विठ्ठल ढालपे व सार्थक संतोष भांड या बालकांच्या हस्ते प्रभाग आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

हेही वाचा: बेडकिहाळ : शॉर्टसर्किटने अडीच एकरातील ऊस खाक

या सोडती वेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, माजी सरपंच ऍड. रावसाहेब पांढरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते एन. के. साळवे, समीर सोरटे, नवाज सोरटे, विशाल साळवे, तसेच उत्तमराव बरडकर, निजाम काझी, संदीप ठोंबरे, अतुल बावकर, शिवाजीराव पिसाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अक्षय भांड व नगरपंचायतीसाठी इच्छुक असे अनेक तरुण याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जाती : प्रभाग क्रमांक 3

अनुसूचित जाती महिला : प्रभाग क्रमांक 12, 13

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : प्रभाग क्रमांक 8, 10

नागरिकांचा मागास प्रवर्ग : प्रभाग क्रमांक 7, 9

सर्वसाधारण महिला : प्रभाग क्रमांक 2, 4, 14, 15, 17

सर्वसाधारण : प्रभाग क्रमांक 1, 5, 6, 11, 16

loading image
go to top