सोलापूर : दुचाकीपेक्षा गड्या पायी वारीच फास्ट!

मागील काही वर्षांत शहरातील वाहतुकीत वाढ होत आहे
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : मागील काही वर्षांत शहरातील वाहतुकीत वाढ होत आहे. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शहरातील वाढत्‍या ट्रॅफिकची समस्या पाहता, दुचाकीपेक्षा पायपीट करणेच बरे, अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. एक किलोमीटर मार्गावर शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवर दुचाकीला १५ मिनिटे तर पायी चालत जाणाऱ्याला १० मिनिटांचा वेळ लागतोय. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीवेस दरम्यान दुचाकीऐवजी पायी वारी केल्‍याने अधिक वेळ वाचत आहे. दुचाकीसाठी उलट पाच मिनिटांचा अधिक वेळ वाया जात आहे.

महापालिकेपासून ते पोलिसांपर्यंत आणि राजकारण्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनी येथील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. ‘सकाळ’ने याची पडताळणी केली. ‘सकाळ’च्या प्रतिनिधींने आपल्‍या सहकाऱ्यासमवेत शहरातील प्रमुख ट्रॅफिक जाम असलेल्‍या मार्गावर एकाच वेळी दुचाकी आणि पायी चालत प्रवास सुरू केला. यात दुचाकीला १५ मिनिटे तर पायी १० मिनिटांचा वेळ लागला. गुरुवारी केलेल्या निरीक्षणावरून येथील असा झाला पायी प्रवास...

छत्रपती शिवाजी महाराज चौक : ११ वाजता सुरवात. हॉटेल शीतल येथे वाहतूक कोंडीमुळे पायी जात असल्याने थांबावे लागले. पायी चालणाऱ्या प्रतिनिधीस नवी वेस चौकीपर्यंत पोचण्यास ११ वाजून १० मिनिटे लागली.

दुचाकीचा प्रवास...

छत्रपती शिवाजी महाराज चौक : ११ वा. सुरवात. दत्त हॉटेल येथे ११ वाजून ४ मिनिटांनी दुचाकी पोचली. येथून ११ वाजून ५ मिनिटांनी सुरवात. हॉटेल शीतल येथे ११ वाजून ७ मिनिटांनी पोचली. येथे दीड मिनिटे दुचाकी थांबली. येथून ११ वाजून ९ मिनिटांनी पुन्हा सुरवात. समोर भागवत चित्रमंदिर येथे २ मिनिटे दुचाकी वाहतूक कोंडीत थांबली. येथून ११ वाजून ११ मिनिटांनी सुरवात आणि नवीवेस चौकी येथे ११ वाजून १५ मिनिटांनी पोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com