Solapur: डीजेमुळे बहिरेपण आलेल्या घटनेत पोलिसांनी जी कलमे लावायला हवी, ती लावलीच नाहीच. ही केवळ एकट्याची हानी नाही, या आवाजाचा अनेकांना त्रास झाला आहे. .या प्रकरणात भारतीय न्याय संहितेचे कलम २९२ लावणे गरजेचे असल्याचे मत ॲड. रियाज एन. शेख यांनी सकाळशी बोलताना सांगितले. तर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी घडलेला प्रकार चुकीचा असून संबंधित परिवाराची भेट घेणार असल्याचे सांगितले..Effects of Cholesterol Deficiency on Hair: कोलेस्ट्रॉलच्या कमतरतेमुळे केसांवर होणारे परिणाम अन् योग्य आहाराने समस्यांवर कसे करावे मात जाणून घ्या.तीन दिवसांपूर्वी देगाव रस्त्यावरील शेरखान वस्तीत राहणाऱ्या राजू यादगिरीकर यांना डीजेच्या आवाजाने बहिरेपणा आल्याची घटना समोर आली. यासंदर्भात त्यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हाही नोंदवला. परंतु, हा गुन्हा नोंद करत असताना, जे महत्त्वाचे कलम लावायला हवे, तेच लावले नसल्याचे समोर आले आहे. ॲड. शेख यांच्या म्हणण्यानुसार १२५ (ब) कलम म्हणजे एखाद्यास वैयक्तिक हानी पोचविणे होय. परंतु, या प्रकरणात वैयक्तिक हानी नाही, तर ती अनेकांची हानी आहे. १२६ (२) कलम म्हणजे आपण एका मार्गाने जाताना अटकाव करणे. त्याला जाऊच दिले नाही, असे हे कलम आहे, जे योग्य आहे. परंतु, याशिवाय ध्वनिप्रदूषणाची कलमे त्यात लावली नाहीत. भारतीय न्याय संहिता कलम २९२ नुसार (नव्या कलमानुसार) हा गुन्हा दाखल होणे, गरजेचे आहे. केवळ एकास नाहीतर तर हा सार्वजनिक उपद्रव आहे. .ज्या यंत्रसामग्रीमुळे हे नुकसान झाले आहे, ती जप्त करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे की पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये कारवाई होणे गरजेचे आहे. त्यानुसार हे कलम लावले तर जो मुद्देमाल आहे, तो जप्त करणे अनिवार्य आहे. ध्वनिप्रदूषण कायदा हे सांगतो की, शाळेच्या परिसरातही हॉर्न वाजवता येत नाही. आवाजामुळे मुके प्राणी व पक्षी यांनाही मज्जासंस्थेचा त्रास होतो.सध्या सर्वत्र उत्सवांची चढाओढ सुरू झाली आहे. कोणतीही जयंती असली तरी त्या-त्या समाजातील लोकांनी एकप्रकारे रस्सीखेचच सुरू असते. पोलिस प्रशासनाची भूमिका केवळ बघ्याची राहिली आहे. जेव्हा डीजे चालू असतो, तेव्हा पोलिस तेथे स्वत: उपस्थित असूनही कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून गुन्हा करू देतात. नंतर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करतात. परवानगी देतानाच हे तपासले पाहिजे. एकंदर पोलिसही हतबल झाल्याचे दिसून येते. कोणताही समाज, पक्ष, पुढारी यांचा रोष पोलिसांना घ्यायचा नाही, असे यातून दिसते. ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि पाच वर्षे कारावास असे शिक्षेचे स्वरूप आहे. प्रत्येकाला प्रदूषण विरहित जीवन जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्याअनुषंगाने विचार करणे गरजेचे आहे..मध्यवर्ती महामंडळाने याच अनुषंगाने दोन वर्षांपूर्वी पारंपरिक वाद्ये वाजवावीत, असा निर्णय घेतला. अबालवृद्ध व दवाखान्यांच्या ठिकाणी याचा त्रास होतो. म्हणून संरक्षणात्मक हा उपाय योजला होता. देगाव रस्त्यावर घडलेली ही घटना दुर्दैवी असून आम्ही परिवारास भेट देणार आहोत. भविष्यातही तरुणांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करा, असे आवाहन करणार आहोत.- सी.ए. सुशील बंदपट्टे, अध्यक्ष, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ, सोलापूर५० ते ६० डेसीबलमुळे लगेच बहिरेपणा येतो. कानाची नस लगेच तुटते. मोठ्या आवाजाने गाणी ऐकणे, इयरफोन लावणे, जोरात आवाज ऐकणे यामुळे सडन हिअरिंग लॉस म्हणजे लगेच कानाचे पडदे फाटतात. त्यासाठी कॉकलिअर इम्प्लांट सर्जरी करावी लागते. परंतु तरीही कर्णबधिरत्व येतेच. अशावेळी स्वत: औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.- डॉ. रेणुका कोल्हे (बिराजदार), कान, नाक, घसा तज्ज्ञ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.