Solapur News: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्नी आवाज उठविणार, आमदार मानेंनी थेटच सांगितले

MLA Yashwant Mane: आमदार माने यांनी रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला तंबी देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिली
Solapur News: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्नी आवाज उठविणार, आमदार मानेंनी थेटच सांगितले
Solapur News sakal

Solapur News: येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्न आम्ही आवाज उठवणार असून, शेतकऱ्यांचा रोष कसा असतो हे शासनाला गेल्या आठवड्यात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत समजला आहे.

वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घरांची पडझड व पिकांची नुकसान भरपाई सुद्धा आता लवकर मिळेल अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

Solapur News: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्नी आवाज उठविणार, आमदार मानेंनी थेटच सांगितले
Solapur Loksabha election Result 2024: प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंचा पराभव कसा केला?

पापरी ता मोहोळ येथील छाया बळीराम कासार या महिलेचा गेल्या पंधरा दिवसापूर्वी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आमदार यशवंत माने आले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी आमदार माने यांच्या समोर काही व्यथा मांडल्या.

26 तारखेला झालेल्या वादळी वाऱ्याने पापरी, खंडाळी, कोन्हेरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्याची पाहणी ही आमदार माने यांनी केली. यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांना काही सूचना दिल्या.

वादळी वाऱ्याने पापरी, खंडाळी आदी सह अन्य गावातील विद्युत महावितरण चे अनेक खांब पडून वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. खांब उभारणीचे काम ही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र काम लवकर संपविण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे महेश माळी यांना "गॅंग" ची संख्या वाढविण्याची सूचना दिली.

Solapur News: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्नी आवाज उठविणार, आमदार मानेंनी थेटच सांगितले
Solapur News : पंढरपूर विधानसभा मविआची उमेदवारी मंगळवेढयातून देण्यासाठी अध्यक्ष पवारांना भेटणार ; कौडूभैरी

सध्या पापरी पेनुर स्त्याचे काम गेल्या अनेक वर्षानंतर सुरू झाले आहे. मात्र ते काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांनी आमदार माने यांच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावेळी आमदार माने यांनी रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराला तंबी देऊन ते काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना दिली.

दरम्यान अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या छाया कासार यांच्या कुटुंबीयांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचा त्वरित प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल करण्याची सुचना देत मी त्याचा पाठपुरावा करतो असेही आमदार माने यावेळी सांगितले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार,महेश माळी, महसूल नायब तहसीलदार डॉ प्रवीणकुमार वराडे, महिला व बालकल्याण अधिकारी किरण सूर्यवंशी, पंचायत समितीच्या कृषी विभागाचे व्ही आर देशमुख, मंडळ निरीक्षक सोमनाथ जाधव, कृषी सहाय्यक लामतुरे, ग्रामसेवक अनंत नकाते, पोलीस पाटील प्रशांत पाटील, सतीश भोसले, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Solapur News: अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुध दर प्रश्नी आवाज उठविणार, आमदार मानेंनी थेटच सांगितले
Solapur News : खोटया विवाह प्रकरणातील तीन संशयतांना मोहोळ पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com