Solapur News : रखडलेली कामे मार्गी लावा,गाव सोबत आणतो भाजप आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्याचे आव्हान

तहसीलदारांनी तात्काळ पुरवठा निरीक्षकाला याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
solapur
solapur sakal

मंगळवेढा - वीस वर्ष आमदाराच्या विरोधातील गाव असल्यामुळे इथली विकास कामे रखडली. मला जेवढं जमतं तेवढी कामे मी वरून निधी आणून केली.आता मी तुमच्या बरोबर आलो.मदत करायला नाही. रखडलेली विकास कामे मार्गी लागली तर 2024 ला वर काय गडबड झाली तर दादा सोबत राहिले की खाली मात्र गाव तुमच्याबरोबर लावायची जबाबदारी घेतो. अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या रामेश्वर मासाळ यांनी आ. समाधान आवताडे यांना त्यांच्या गाव भेट दौय्रात गोणेवाडी येथे दिली.

आज आ. समाधान आवताडे यांनी अकोला, गणेशवाडी, शेलवाडी,आंधळगाव,लेंडवे चिंचाळे, शिरशी, गोणेवाडी, खुपसंगी,जालीहाळ या गावाचा दौरा केला. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, आंबादास कुलकर्णी,सुरेश भाकरे,राजेद्र सुरवसे,दत्तात्रय जमदाडे,चंद्रकांत जाधव,दिगंबर यादव,आदीसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यात गोणेवाडी येथे सरपंच रामेश्वर मासाळ यांनी वीस वर्षांमध्ये गावातील विकास कामात आलेल्या अडचणी कथन करत आज राष्ट्रवादीचे अजित दादा व तुम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळे प्रलंबित विकास कामे मार्गी लागणे अपेक्षित आहे ही कामे मार्गी लागली तर या गावात मताधिक्य घेण्यास काही अडचण येणार नाही

solapur
Solapur News : पाण्याअभावी लिंबांची बाग उपटली

शिरसी, गोणेवाडी,लेडवे चिंचाळे या वारकय्राठीच्या मार्गासाठी पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडून निधी उपलब्ध केला परंतु या कामाला स्थगिती असल्यामुळे ही कामे करता येईना त्यामुळे या कामावरील स्थगिती उठवणे गरजेचे आहे.रस्ते व पेवर ब्लॉक साठी निधी मिळण्याची मागणी केली.

solapur
Solapur News : 'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी सांगोल्याचा कारभार चालतो रामभरोसे'

गणेश वाडी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देण्याची मागणी केली आंधळगाव येथे जनावरांसाठी चारा डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी केली तर लेंडव चिंचाळे, आंधळगाव, शेलवाडी या भागातून शालेय विद्यार्थ्यी, नागरिकांसाठी एसटी बसेसची मागणी करण्यात आली.खुपसंगी येथे स्वस्त धान्य दुकानदार वेळेवर दुकान उघडत नसल्याचे व माल देत नसल्याची तक्रार केली यावेळी तहसीलदारांनी तात्काळ पुरवठा निरीक्षकाला याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.

जालीहाळ येथे जालीहाळ -नंदेश्वर या रस्त्याची मुरमीकरण करावे, जालीहाळ-हाजापूर रस्ता डांबरीकरण करावा ही मागणी केली तर शासकीय बोअरचे पाणी खाजगी शेतकरी घेत वापरत असल्याची तक्रार करण्यात आली. शिरसी येथे जलजीवन योजनेतून वाडीवस्तीवरील पाईपलाईनचे काम झाले नसल्याची व कोटेशन भरून महावितरणने कनेक्शन दिले नसल्याची तक्रार केली,शासकीय रस्ता शेतकय्राने अडवल्याची तक्रार केली.

solapur
Solapur: ‘खाकी’ वर्दीच्या हुशारीचा डब्बलगेम; कारवाया दाखविण्याबरोबरच मटका तेजीत ठेवण्यास सहकार्य

रस्त्या संदर्भात तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी सूचना केली. दौऱ्याच्या निमित्ताने अधिकारी सोबत असल्यामुळे लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत शिवाय निधी मिळवण्याच्या दृष्टीने गावकरी गड तट विसरून लोक एकत्र येत असल्याबाबत आ.समाधान आवताडे यांनी समाधान व्यक्त केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com