
सोलापूर : महिला व बालविकास विभागाच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी झाला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून त्यात बालविवाह प्रतिबंधसंबंधीचा ठराव करायचा आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य, अधिकाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांना बालविवाह होऊ देणार नाही म्हणून प्रतिज्ञा घ्यावी लागणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी आता गावकऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.