
सांगोला : फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याशिवाय व निरा - देवधरचे पाणी सांगोल्यापर्यंत गेल्याशिवाय मी कोणत्याही स्वरूपाचा सत्कार स्वीकारणार नसल्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. मी यासाठी अध्यापही सत्कार स्वीकारत नाही.
फलटण विधानसभेची जागा जिंकल्यानंतर यापुढे सोलापूर जिल्हा व विशेषतः माढा मतदारसंघावर भाजप वाढीसाठी विशेष लक्ष देणार असल्याचे माढ्याचे खासदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.