सोलापूर : नगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची नगर अभियंते कारंजे यांनी केली पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त जुन्या नगरपालिकेचे सुशोभीकरण

सोलापूर : पारतंत्र्यात तिरंगा ध्वज डौलाने फडकवलेल्या नवी पेठेतील सोलापूर नगरपालिकेच्या (सध्याची महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ) ऐतिहासिक इमारतीचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सुभोभीकरणासाठी महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी आज (गुरुवारी) इमारत परिसराची पाहणी केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखदार, शानदार साजरा करण्यासाठी महापालिका जय्यत तयारी करीत आहे. कौन्सिल हॉल व प्रशासकीय इमारतीचेही सुशोभीकरण करण्यात येत आहे.

त्याचबरोबर पारतंत्र्यात ज्या सोलापूर नगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला, त्या नवीपेठ येथील ऐतिहासिक इमारतीचीही रंगरंगोटी, सुशोभीकरण व इतर कामे करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नगर अभियंता कारंजे यांना दिले होते. नगर अभियंता कारंजे यांनी तातडीने आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नवी पेठ येथील जुनी नगरपालिका इमारत (सध्याची महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ) परिसराची संपूर्ण पाहणी केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या ऐतिहासिक प्रेरणादायी इमारतीला रंगरंगोटी, स्वच्छता, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

पारतंत्र्यात तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेल्या येथील ध्वजस्तंभाची नगर अभियंता कारंजे यांनी आवर्जून पाहणी केली. झोन व इतर अधिकाऱ्यांना येथील परिसरातील स्वच्छता, साफसफाई व अन्य कामे करण्याच्या सूचना कारंजे यांनी दिल्या आहेत. उद्यान अधीक्षक रोहित माने यांनाही आवश्‍यक ती कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. या इमारतीच्या कंपाउंडमधील कोपऱ्यात बंद पडलेली दोन वाहने तत्काळ इतरत्र हलविली जाणार आहेत.

Web Title: Solapur Old Municipality Elixir Of Freedom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..