Onion prices tumble ahead of festive season — Solapur traders report steep drop
उ. सोलापूर : बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेने २०० रुपयांनी दर कमी झाला आहे. बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला अवघा ९०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. सध्या बाजारात नवीन कांदा दाखल होत असून, त्याची कवडीमोल दराने त्याची विक्री होत आहे. अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचा दर्जा घसरल्याचा हा परिणाम आहे.