
Onion farmers in Solapur face financial losses as Centre imposes export ban; Diwali celebrations overshadowed.
Sakal
रोपळे बुद्रूक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरण्याऐवजी चिंतेची ठरली आहे. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात न मिळणारे दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. चांगले उत्पादन घेऊनही बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकऱ्यांना आपला कांदाही कवडीमोल दरात विकावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदाची दिवाळी अंधारातच जाणार आहे.