खासदार असदुद्दीन ओवेसी लवकरच सोलापूरच्या दौऱ्यावर

औरंगाबादमध्ये एमआयएमची ठरली रणनीती
असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसीsakal
Published on

सोलापूर : राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलिमीन पार्टीची औरंगाबादमध्ये बैठक नुकतीच क झाली. पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आगामी निवडणुकांची रणनीती या बैठकीत ठरली असून, खासदार ओवेसी लवकरच सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली.
औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीस खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, आमदार फारुक शाह, माजी आमदार वारिस पठाण, मोईन सय्यद, सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष शाब्दी यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई विभागातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहर व जिल्ह्यात एमआयएमने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती शहराध्यक्ष शाब्दी यांनी या बैठकीत सादर केली.

असदुद्दीन ओवैसी
कऱ्हाड : फटाक्यांच्या विक्रीला परवानगी तर उडविण्यास बंदी

सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक एमआयएम कोणत्या ठळक मुद्द्यावर लढविणार? याबाबतची माहिती या बैठकीत देण्यात आली. सोलापूर एमआयएमचा जाहीरनामा शहराध्यक्ष शाब्दी यांनी खासदार ओवेसी यांच्यासमोर सादर केला. आगामी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करा. माझे व माझ्या टीमचे सोलापूरकडे विशेष लक्ष आहे, असेही खासदार ओवेसी यांनी आम्हाला सांगितल्याचे शाब्दी म्हणाले.
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
सोलापूर महापालिकेतील एमआयएमचे काही नगरसेवक एमआयएमला सोडून जात आहेत. इतर पक्षाच्या संपर्कात आहेत. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या, पक्षाला काही फरक पडणार नाही. आपल्याला पुढे जायचे आहे. पक्षवाढीसाठी काम करा. मागील महापालिका निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी सूचना खासदार ओवेसी यांनी दिल्याची माहिती शहराध्यक्ष शाब्दी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com