सोलापूर : रुग्णसंख्येचे द्विशतक तरीही नाही गांभीर्य

प्रशासनासह नागरिक निवडणूक व सण-उत्सवांत दंग
Corona updates latest marathi news
Corona updates latest marathi newsesakal
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच रोज नवनवे आदेश लागू होत होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क सक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीत सूट नव्हती; मात्र सध्या जिल्‍ह्‍यात कोरोना रुग्णसंख्येने दोनशेचा अाकडा ओलांडला तरीही कोरोनासाठी नवे नियम लागू झालेले नाहीत. प्रशासन व नागरिकही निवडणुकांसह सण-उत्सवांमध्ये दंग आहेत.

सध्‍या कोरोना रुग्णसंख्या २३४ वर गेली आहे. यामध्‍ये शहरात १३४ तर ग्रामीण भागात १०० रुग्‍ण उपचार घेत आहेत. मागील काही महिन्‍यात कोरोनामुळे जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. मात्र, आषाढी एकादशीनिमित्त पालख्या जिल्ह्यात आल्यानंतर खुद्द पंढरपुरातच एका रुग्णाचा मृत्यू झाला. वारी सोहळ्यात कोरोनो चाचणी व बूस्टर डोसची सुविधा करण्यात आली होती. मात्र, मास्कची सक्ती आणि नागरिकांच्या लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्नांची गरज होती. मागील दहा दिवसांत शहर व ग्रामीण भागात दररोज ३० ते ५० नव्या रुग्णांची भर पडत आहे.

ठळक बाबी

बूस्टर डोसची सक्ती नसल्याने लस घेण्याबाबत उदासीनता

लसीकरण न झालेली १२ वर्षांखालील मुले व दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या मोठी

मास्क सक्तीचा सर्वांनाच विसर; किमान गर्दीच्या ठिकाणी असावी मास्कची सक्ती

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मोर्चे, आंदोलने व कार्यक्रमांवर निर्बंध आवश्यक

बूस्टर डोससाठी जनजागृती व सर्व्हे होणे आवश्यक

आषाढीचा परिणाम अटळ

आषाढी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात १५ लाख भाविक एकत्र आले होते. राज्यातील काही भागांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील यापुढील रुग्णसंख्येवर या गर्दीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आषाढीनंतर कोरोनाच्या चाचण्या व लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले तरच रुग्णसंख्येचा संभाव्य विस्फोट आटोक्यात आणणे शक्य आहे. यानंतर गुरुपौर्णिमा आणि श्रावणातील सण-उत्सवांमुळेही गर्दीच्या कार्यक्रमांची भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com