Solapur : मंदिर वाचविण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचा पुण्‍यात ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : मंदिर वाचविण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचा पुण्‍यात ठिय्या

मोहोळ : पोखरापूर (ता. मोहोळ) येथील प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्गासाठी तातडीने नवीन आराखडा तयार करण्यात ‌यावा, या मागणीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आले.

पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्याबाबत ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर केला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने वारंवार निवेदने दिली, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय पंढरपूर यांनी पुरातत्त्व विभागाच्‍या निर्देशानुसार प्राचीन‌ जगदंबा मंदिरास धोका निर्देश असतानाही पोचणार नाही याची दक्षता घ्यावी व प्रस्तावित महामार्गासाठी नवीन आराखडा तयार करण्यात ‌यावा असे निर्देश १७ जून २०२२ रोजी दिले. महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे महामार्गाचे काम करत आहेत. पोखरापूर गावाजवळची सलग सात अपघाती वळणे दूर करावीत.

नैसर्गिक प्रवाहामध्ये बेकायदेशीर बदल करून चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल दुरुस्त करावा. या मागणीसाठी सातत्याने ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत. स्थानिकांच्या मागणी व भावनांचा आदर न करता देवस्थान ट्रस्टीवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल करुन दडपशाहीने सुरू असलेल्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी व प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामस्थांनी जागरण आंदोलन केले.

मागणीचे निवेदन पुणे विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल ‌‌यांना देण्यात आले. यावेळी जगदंबा ट्रस्टीचे अध्यक्ष धोंडीबा उन्हाळे, श्रीधर उन्हाळे, संजीव खिलारे, दगडू आगलावे, शाहू उन्हाळे, शिवाजीराव बाबर, बाळासाहेब खंदारे, नागनाथ उन्हाळे, बाबुराव खंदारे, बालाजी उन्हाळे, रणजित उन्हाळे, महादेव चव्हाण, सागर मोरे, ऋषीकेश कदम, कृष्णदेव रोकडे, गणेश बुरगुटे व आराधना मंडळ उपस्थित

होते.

Web Title: Solapur Pokharapur Villagers Stay Pune Save Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..