Solapur : पंढरपूर, माळशिरस भाजपमध्ये सुप्त संघर्ष

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने परिवर्तन झाले
आमदार राम सातपुतें
आमदार राम सातपुतेंsakal

पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने परिवर्तन झाले. या परिवर्तनामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारकांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी मागील पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी एक पाऊल‌मागे घेत समाधान आवताडे यांना मोठी मदत केली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक हे आवताडेंना मदत करतील अशी शक्यता कमी आहे.

त्यामुळे प्रशांत परिचारकांनी आतापासूनच पंढरपूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांना समविचारी आघाडीच्या माध्यमातून शह देण्यात परिचारक यशस्वी झाले आहेत. तेव्हापासून परिचारक दोन्ही तालुक्यात अधिक सक्रिय झाले आहेत. तर आमदार आवताडे यांनी ही राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली आहे.

मंगळवेढ्याबरोबरच पंढरपूर आणि तालुक्यातील २२ गावांना अधिक विकास निधी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच आमदार आवताडे यांनी भालके-परिचाकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. यातूनच परिचारक आणि आवताडे यांच्यामधील सुप्त सत्तासंघर्ष वाढू लागला आहे. अलीकडेच आमदार समाधान आवताडे यांनी मतदार संघासाठी १० कोटींची विकास कामे मंजूर केल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विकास कामांना निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे जाहीर केले आहे. विकास कामावरून आता या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने परिवर्तन झाले. या परिवर्तनामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारकांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी मागील पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी एक पाऊल‌मागे घेत समाधान आवताडे यांना मोठी मदत केली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक हे आवताडेंना मदत करतील अशी शक्यता कमी आहे.

त्यामुळे प्रशांत परिचारकांनी आतापासूनच पंढरपूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांना समविचारी आघाडीच्या माध्यमातून शह देण्यात परिचारक यशस्वी झाले आहेत. तेव्हापासून परिचारक दोन्ही तालुक्यात अधिक सक्रिय झाले आहेत. तर आमदार आवताडे यांनी ही राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली आहे.

मंगळवेढ्याबरोबरच पंढरपूर आणि तालुक्यातील २२ गावांना अधिक विकास निधी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच आमदार आवताडे यांनी भालके-परिचाकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. यातूनच परिचारक आणि आवताडे यांच्यामधील सुप्त सत्तासंघर्ष वाढू लागला आहे. अलीकडेच आमदार समाधान आवताडे यांनी मतदार संघासाठी १० कोटींची विकास कामे मंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विकास कामांना निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे जाहीर केले आहे. विकास कामावरून आता या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

आमदार सातपुते विरुद्ध मोहिते-पाटील

पंढरपूरप्रमाणेच माळशिरसच्या राजकारणातही असाच सत्ताधारी दोन भाजप आमदारांमध्ये सुप्त सत्तासंघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे माळशिरसच्या इतिहासात प्रथमच आमदार राम सातपुते यांच्या रूपाने भाजपला संधी मिळाली आहे. भाजपला साथ दिल्याचे बक्षीस म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे माळशिरसमध्ये भाजपला दोन आमदार मिळाले आहेत.

येथे आमदार राम सातपुतेंविरुध्द आमदार रणजितसिंह मोहिते पाटील असा सुप्त राजकीय संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. माळशिरस मतदार संघ राखीव झाल्यानंतर मोहिते पाटलांच्या मर्जीतील कार्यकर्त्याला आमदारकीची संधी दिले जाते. यावेळी मात्र मोहिते पाटलांच्या मर्जीशिवाय भाजपने आपल्या मर्जीने उमेदवार दिला आहे.

त्यामुळे आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय सख्य फारसे जुळताना दिसत नाही. एकाच म्यानात आमदारकीच्या दोन तलवारी असल्याने या दोन आमदारांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे. माळशिरसमध्ये पूर्वीचा भाजप गट आणि नव्याने भाजपात आलेला मोहिते पाटलांचा गट, असे दोन गट आजही तालुक्यात आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमदार राम सातपुते यांच्याकडून जुन्या भाजप गटाला झुकते माफ दिले जात

असल्याचा आरोप मोहिते-पाटील समर्थकांमधून दबक्या आवाजात केला जातो. यावर मोहिते पाटलांनाही आमदार सातपुते यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक वेळा खासगीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सातपुतेंचा राजकीय वारू रोखण्यासाठी आता मोहिते पाटलांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे.

कट्टर विरोधक असलेले माळशिरसचे भाजप नेते अॅड. सुभाष पाटील यांच्या सोबत झालेली राजकीय मैत्री त्याचेच एक धोतक मानले जाते. आगामी काळात मोहिेते पाटील कसा डाव खेळतात यावरच आमदार सातपुते यांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com