esakal | Solapur: विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही : आमदार पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार शहाजी पाटील

विकासासाठी कोठेही कमी पडणार नाही : आमदार पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगोला : सांगोला शहराच्या इतिहासाला गवसणी घालणारी ही नगरपरिषदेची निवडणूक असणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे रस्ते, झेंडे वेगळे-वेगळे असले तरी विकासाच्या मंदिराकडे जाण्यासाठी सर्वजण एकत्रित आले आहेत. शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही एकत्रित आहोत. आमदार म्हणून विकासासाठी, निधीसाठी कोठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन आमदार शहाजी पाटील यांनी दिले.

आगामी नगरपालिकेचे निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सांगोला येथील हर्षद लॉन येथे पार पडला. यावेळी आमदार शहाजी पाटील बोलत होते. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठनेते प्रा. पी. सी झपके, शिवसेनेचे भाऊसाहेब रुपनर, बाबुराव गायकवाड, कमरुद्धीन खतीब, तानाजी पाटील, सुनिल भोरे, डॉ. पियूष साळुंखे-पाटील, चंदन होनराव, सचिन लोखंडे, सतीश सावंत, भागाबाई जाधव, शोभा घोंगडे, अनुराधा खरतडे, रंजना बनसोडे, संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

साळुंखे-पाटील म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्षाचा स्थानिक आमदार असला की काय फायदा होतो हे शहाजीबापूंनी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता नगरपरिषदेवर एकमुखी आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्‍चितपणे शहराचा कायापालट होईल. यावेळी पी. सी. झपके, सुनील भोरे, शिवाजी बनकर, तानाजी पाटील, भाऊसाहेब रुपनर, बाबुराव गायकवाड, डॉ पियूष साळुंखे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनोज उकळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.

ही युती तुटायची न्हाय

तालुक्‍यातील सर्व दिग्गज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले आहेत. जागावाटपात काहीतरी बिनसेल, युती तुटेल असे अनेकांना स्वप्ने पडत आहेत. परंतु, यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील सर्वच प्रमुखांनी ही युती कोणत्याही परिस्थितीत तुटायची नाही, असे ठोस आश्वासनच कार्यकर्त्यांना दिले.

loading image
go to top