Solapur : राजन पाटील परिवाराला घेरण्याचा उमेश पाटील यांचा नवा डाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 राजन पाटील v उमेश पाटील

Solapur politics : राजन पाटील परिवाराला घेरण्याचा उमेश पाटील यांचा नवा डाव

सोलापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राजन पाटील अनगरकर परिवाराला घेरण्याचा डाव राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आखला असून या पार्श्वभूमीवर, या आखलेल्या डावाचा पत्ताच त्यांनी रविवारी ता. ( २०) पत्रकार परिषदेतून 'ओपन' केला.

दरम्यान उमेश पाटील यांनी टाकलेल्या नव्या डावावर राजन पाटील परिवार पुन्हा घायाळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उमेश पाटील यांनी नव्याच प्रकरणाचे 'ओपन चॅलेंज' राजन पाटील यांना दिल्याने, या प्रकरणात अनगरकर पाटील परिवाराला पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई खेळावी लागणार हे उघड दिसतआहे.

राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांच्यावर ज्या खून प्रकरणाचा आरोप झाला होता, त्या संदर्भात हायकोर्टात प्रलंबित असलेली फाईल ओपन करण्यासंदर्भातील पत्ता उमेश पाटील यांनी ओपन केला आहे, या प्रकरणातून राजन पाटील परिवाराला घेरण्याचा उमेश पाटील यांचा नवा जबरी डाव आहे.

या पार्श्वभूमीवर, स्व. पंडित देशमुख यांचे सुपुत्र विकी देशमुख यांना 'त्या' फाईलसंदर्भात बळ देण्याचे उमेश पाटील यांचे धोरण आहे, हे लपून राहिलेले नाही

खुनाबाबतची हायकोर्टातील 'ती' फाईल ओपन करणे हे अनगरकर पाटील यांच्यासाठी डोकेदुखीचे ठरणार आहे.

कट्टर राजकीय दुश्मन राजन पाटील यांना गारद करण्यासाठी उमेश पाटील यांनी टाकलेला डाव हा भयानक समजला जात आहे, याने राजन पाटील परिवार डिस्टर्ब राहू शकतो. मोहोळ तालुक्यातील दोघा पाटलांमधली राजकीय दुश्मनी किती वेगवेगळ्या वळणावर जात आहे, हेच उमेश पाटील यांनी आखलेल्या डावातू स्पष्ट होत आहे.

सन २००७ मध्ये म्हणजे १५ वर्षांपुर्वी राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांचे नाव शिवसेनेचे मोहोळचे तत्कालीन नेते पंडित देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आले होते. दरम्यान या प्रकरणात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने बाळराजे पाटील यांना निर्दोष सोडले.

तथापि,जिल्हा व सत्र न्यायालयाने बाळराजे पाटील यांना निर्दोष मुक्त करण्याच्या निकालावर मुंबई उच्च न्यायालयात सन २००७ मध्ये अपील दाखल आहे. या अपीलाची मुंबई उच्च न्यायालयात फाईल प्रलंबीत आहे, हीच फाईल पुन्हा स्टॅंड करण्याचे चॅलेंज उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहे.

'त्या' वक्तव्यावर कायदे तज्ञांचे मागविले मार्गदर्शन

मोहोळ शिवसेनेचे नेते स्वर्गीय पंडितराव देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम ३०२ मध्ये बाळराजे पाटील यांचे नाव आले होते, या प्रकरणात न्यायालयाने बाळराजे पाटील यांना सोडले आहे. पण या प्रकरणाची केस हायकोर्टात आहे, असे असताना, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत राजन पाटील यांनी आपल्या सुपुत्रावरील ३०२ कलमाचे समर्थन केले आहे. त्याची ऑडिओ क्लिप आहे, ही ऑडिओ क्लिप मुंबई उच्च न्यायालयात पंडित देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणी वेळी न्यायाधीशांना ऐकवता येईल का, याची चाचपणी उमेश पाटील गटाकडून केली जात असून यासंदर्भात प्रसिद्ध कायदे तज्ञांकडून उमेश पाटील हे सल्ला घेत असल्याची माहिती समोर येत आहे.