सोलापूर : सहा महिन्यांत ७२ हजार परवान्यांचे वाटप

आरसी बूक, परवाने घरपोच; पोस्टाला मिळाला महसूल
Post Office
Post Officeesakal

सोलापूर : मागील काही वर्षापासून पोस्टाकडून नागरिकांना वाहन परवाना व वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र अर्थात आरसी बुक घरपोच मिळत असून, दर महिन्यांला दहा हजारांहून अधिक वाहन परवान्यांचे वाटप करण्यात येते. मागील सहा महिन्यांत जवळपास ७२ हजार १५१ वाहन परवाने आणि आरसी बूकचे वाटप करण्यात आले. यातून लाखो रुपयांचा महसूल देखील पोस्ट खात्याला मिळत असल्याची माहिती डाक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फेत नागरिकांची आरटीओ कार्यालयातील होणारी धावपळ थांबावी यासाठी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र डाक विभागातर्फे घरपोच देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासन व डाक विभाग यांच्यात करार करण्यात आला आहे. या करारानुसार आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाला प्रती टपालाचे पैसे मिळतात. महिन्याला जितके टपाल आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाला पाठविण्यात येईल, त्याप्रमाणे आरटीओकडून डाक विभागाला पैसे देण्यात येतात.

Post Office
आणीबाणीची वेळ; राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - राज ठाकरे

दर महिन्याला डाक विभागाला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोस्टाचे कर्मचारी दररोज आरटीओ कार्यालयात जाऊन वाहन परवाने व आरसी बुक आणून, त्याची पोस्टात नोंदणी करीत असतात. त्यानंतर एका पाकिटात हे वाहन परवाने व आरसी बुक टाकून त्यावर संबंधित व्यक्‍तीच्या पत्ता टाकून ते त्या-त्या भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येते. आरटीओ कार्यालयाकडून हे टपाल आणल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याचे डाक विभागाकडून सांगण्यात आले. तसचे ज्या व्यक्‍तीचे टपाल परत येते, ते टपाल पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे देण्यात येत असल्याचे डाक विभागांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com