सोलापूर : चंदनशिवेंच्या आमदारकीचा प्रणिती शिंदेंकडून प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणिती शिंदें

सोलापूर : चंदनशिवेंच्या आमदारकीचा प्रणिती शिंदेंकडून प्रस्ताव

सोलापूर: नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून करत आमदार प्रणिती शिंदे यांनी गुगली टाकली. त्यांच्या या गुगलीने उपस्थितांमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही गुगली ओळखत भावी आमदाराचा विषय क्‍लिअर केला. चंदनशिवे यांना आणखी काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून उत्तर भावी आमदार कोण? हा प्रश्‍न कायम ठेवला.

सोलापूर शहराच्या राजकारणात सध्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळच्या असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना, शिवसेना, एमआयएममधील नेत्यांना राष्ट्रवादी आपल्या जाळ्यात ओढत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असलेल्या स्मारक व वास्तूचे सुशोभिकरण, भूमिपूजन पालकमंत्री भरणे यांनी करत आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा श्रीगणेशाच केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात दलित चेहरा म्हणून ओळख असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने हे कार्यक्रम आखले होते. ही सर्व जबाबदारी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी लिलया पार पाडली.

या कार्यक्रमात माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे यांचे नाव पत्रिकेत व पालकमंत्री यांच्या दौऱ्यात दिसले नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी आयत्यावेळी उपस्थिती लावली. माजी महापौर महेश कोठे हे शहर उत्तरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून समोर येतील अशी जोरदार चर्चा असताना आमदार शिंदे यांनी चंदनशिवे यांच्या नावाचा टायमिंग बॉम्ब फोडला.

नगरसेवक चंदनशिवे यांना आणखीन काम करण्याची गरज असल्याचे सांगून पालकमंत्री भरणे यांनी हा विषय जागेवर थांबविला.

पालकमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला; श्रेयवादाचा विषय रंगला

बंधने संपली आता प्रतीक्षा प्रवेशाची

माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह सोलापूर महापालिकेतील काँग्रेस, शिवसेना व भाजपमधून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे या इच्छुकांना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका आता बसणार नाही. या इच्छुक नेत्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Solapur Pranati Shinde Proposal For Chandanshive Mla Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top