esakal | फेब्रुवारीनंतर 'पार्क'वर सोलापूर प्रिमिअर लिग ! 'रणजी'साठी रणजितसिंहांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननला पत्र

बोलून बातमी शोधा

1ranji_esakal (2) - Copy.jpg

रणजी सामने होण्यासाठीचे प्लस पॉईंट...

 • पार्क स्टेडिअमवरील मैदानाची चौहूबाजूंनी आहे 70 यार्ड लांबी- रुंदी
 • खेळाडूंच्या राहण्यासाठी सोलापुरात आहे पंचतारांकित हॉटेलची सोय
 • वाहनांच्या पार्कंची नॉर्थकोट, चौपाटी येथे होऊ शकते व्यवस्था
 • सलग चार तास पाऊस झाला, तरीही अर्ध्या तासात मैदानावर पुन्हा होऊ शकतो सामना
 • मैदानाची लेव्हल, टॉपअप, रोलिंग दर्जेदार; मैदानावर लावले अमेरिकन बर्मुडा ग्रास
 • पॅव्हेलियनमध्ये 25 हजार प्रेक्षक बसण्याची आहे व्यवस्था; खेळाडूंचे ड्रेसिंग रुमही अद्ययावत
फेब्रुवारीनंतर 'पार्क'वर सोलापूर प्रिमिअर लिग ! 'रणजी'साठी रणजितसिंहांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननला पत्र
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासारखी उभारणी केली जात आहे. मैदानावर अमेरिकन बमुर्डा ग्रास लावण्यात आला असून, मैदानावर पाणी मारण्यासाठी दोन लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. चौहूबाजूंनी मैदानाची लांबी-रुंदी 70 यार्ड आहे. मैदानावर 11 मुख्य पिच असून, सरावासाठी आठ पिच आहेत. रणजी सामन्यांच्या आयोजनापूर्वी फेब्रुवारीनंतर सोलापूर प्रिमिअर लिगचे आयोजन केले जाणार आहे. तत्पूर्वी, सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला रणजी सामन्यांबाबत पत्र पाठविले आहे.

रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या पुढाकारातून रणजी सामन्यांसाठी प्रयत्न
इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवरील मैदान दर्जेदार होण्यासाठी कंत्राटदार नरसिंग राठोड यांनी मेहनत घेतली आहे. मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले असून मैदानाचे फोटो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला व सोलापुरातील माजी रणजी व आंरराष्ट्रीय खेळाडूंना पाठविले आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या पुढाकारातून पार्क मैदानावर पहिल्या टप्प्यात अंडर 19 व 22 वर्षांखालील खेळाडूंचे राज्यस्तरीय सामने खेळविले जातील. 
- चंदू रेंबर्सू, सचिव, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन


इंदिरा गांधी स्टेडिअमवर पहिल्यांदा रणजी सामने झाल्यानंतर मैदान, पिच कशी आहे, याचा अंदाज येईल. त्यानंतर संबंधित सामन्यातील स्कोअर व मैदान आणि स्टेडिअमवरील व्यवस्थेची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली जाणार आहे. आतापर्यंत पार्क स्टेडिअमवर सात रणजी सामने व एक देवधर ट्रॉफीचे सामने खेळविले गेले आहेत. दरम्यान, आता स्मार्ट सिटी योजनेतून मैदानावर पाणी मारण्यासाठी दोन लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. स्प्रिंक्‍लरचीही सोय करण्यात आली आहे. बदललेल्या मैदानाचे फोटो सोलापूर क्रिकेट असोसिएशनने मूळचे सोलापूरचे खेळाडू असलेले रोहित जाधव, नितीन देशमुख, के. टी. पवार, अनिल चोथे यांना पाठविण्यात आले असून त्यांनी मैदानाचे कौतूक केले आहे. पांडूरंग साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावरील व्यवस्था केली जात आहे. फेब्रुवारीनंतर सोलापूर प्रिमिअर लिग होणार असून त्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान हे सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय 19 व 22 वर्षांवरील सामने सोलापुरात आयोजित होतील आणि या स्पर्धेतील अनुभवावरून रणजी व आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दृष्टीने तयारी केली जाईल, अशी माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंदू रेंबुर्स यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


रणजी सामने होण्यासाठीचे प्लस पॉईंट...

 • पार्क स्टेडिअमवरील मैदानाची चौहूबाजूंनी आहे 70 यार्ड लांबी- रुंदी
 • खेळाडूंच्या राहण्यासाठी सोलापुरात आहे पंचतारांकित हॉटेलची सोय
 • वाहनांच्या पार्कंची नॉर्थकोट, चौपाटी येथे होऊ शकते व्यवस्था
 • सलग चार तास पाऊस झाला, तरीही अर्ध्या तासात मैदानावर पुन्हा होऊ शकतो सामना
 • मैदानाची लेव्हल, टॉपअप, रोलिंग दर्जेदार; मैदानावर लावले अमेरिकन बर्मुडा ग्रास
 • पॅव्हेलियनमध्ये 25 हजार प्रेक्षक बसण्याची आहे व्यवस्था; खेळाडूंचे ड्रेसिंग रुमही अद्ययावत