सोलापूर-पुणे डेमूचा रेक ‘उत्कृष्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Demu Passenger Railway

सोलापूर-पुणे डेमूचा रेक ‘उत्कृष्ट’

सोलापूर : सोलापूर-पुणे डेमू (पॅसेंजर)च्या रेकमध्ये अत्याधुनिक पध्दतीने बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर विभागांतून धावणाऱ्या सोलापूर-हसन एक्‍सप्रेसनंतर उत्कृष्ट म्हणून सोलापूर-पुणे डेमूमध्ये प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी बदल करण्यात आला आहे.

सोलापूर-पुणे दरम्यानची दुसरी पॅसेंजर(डेमू) उत्कृष्ठ डब्यासह १५ सप्टेंबरपासून धावत आहे. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर, आनंददायी होणार आहे. यामध्ये बऱ्याच सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये शौचालयामध्ये स्टाईल बसविण्यात आल्या आहेत. याचे काम हे सोलापूर येथील आयओएच डेपोत करण्यात आले आहे. सर्वप्रथम सोलापूर-मुंबई दरम्यान धावणारी सिद्धेश्वर एक्‍स्प्रेसच्या डबे सुविधा अंतर्गत उत्कृष्ट बनविण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सोलापूर-हसन एक्‍सप्रेसच्या डब्यात देखील आतमधून सोयी-सुविधा व सौंदर्यीकरण आणि सुधारणा करण्यात आली. यानंतर आता सोलापूर-पुणे डेमूचे उत्कृष्ट म्हणून धावत आहे. सोलापूर-पुणे डेमूचा रेक उत्कृष्ट होऊन प्रवाशांच्या सेवेत धावत आहे.

ठळक बाबी.....

दुर्गंधी नियंत्रण करणारी यंत्रणा

एलईडी लाईट, एलईडी घड्याळ बसविले आहे

वायफाय किट बसविण्यात आले आहे

डब्याच्या आतमध्ये अत्याधुनिक पध्दतीचे स्वच्छतागृह

अत्याधुनिक पद्धतीची आसनव्यवस्था

विशिष्ट प्रकारचे आकर्षक रॅपिंग

निळा डब्यांना बाहेरून आकर्षक बिस्किट रंग

एडमिन पेंटिंग केली असून, ही पेंटिंग्ज डब्यांच्या तुलनेने अतिशय वेगळी आहे

‘उत्कृष्ट रेक’ म्हणजे काय?

सोलापूर-पुणे डेमू (पॅसेंजर) डब्यांच्या आधुनिकीकरणाबरोबरच डब्याच्या आतील सुविधा वाढविण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेच्या निवडक गाड्यांना उत्कृष्ट करण्यासाठी काम केले आहे. सोलापूर-हसन एक्‍सप्रेसचा रेक उत्कृष्ट पद्धतीने बनविण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर-डेमूचा रेक देखील उत्कृष्ट बनविण्यात आला आहे. सिद्धेश्वर, हसन एक्‍सप्रेसनंतर सोलापूर-पुणे डेमू ही सोलापूर विभागातील उत्कृष्ट सुविधेत समावेश झाला आहे.

Web Title: Solapur Pune Demu Rake Excellent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..