esakal | रेल्वे प्रवाशांसाठी ! सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

intercity-expres
  • दौण्ड- पुणे विभागातील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक 
  • दौण्ड- पुणे- दौण्ड पैंसेजर रद्द करण्यात आली 
  • बारामती-पुणे ही गाडी दौण्ड स्थानकापर्यंत धावणार 
  • पुणे- अंजनी एक्‍सप्रेस दौण्ड कॉर्ड लाइनमार्गे धावणार 
  • - जम्मुतावी- पुणे झेलम एक्‍सप्रेसचे मार्ग बदलण्यात आला 
  • हजरत निजामुद्दीन- वास्को- द- गामा गोवा एक्‍सप्रेसच्या मार्गातही बदल 
  • बेंगलोर- मुंबई उद्यान एक्‍सप्रेस दौण्ड स्थानकावरुन व्हाया दौंड कॉर्ड लाइनमार्गे धावेल 

रेल्वे प्रवाशांसाठी ! सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी सोलापूर- पुणे इंटरसिटी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

हेही नक्‍की वाचा : अर्रर्र ! आगार व्यवस्थापकांच्या खाद्यांवर उत्पन्नाचे ओझे 


मागील 10- 11 महिन्यांपासून दुहेरीकरण, भुयारी मार्ग, रुळ दुरुस्ती यासह अन्य कामांच्या अडथळ्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग परावर्तीत करण्यात आले. आता 7 मार्चला दौण्ड- पाटस दरम्यान ट्राफिक ब्लॉक असल्याने दौण्ड- पुणे- दौण्ड पैंसेजर रद्द करण्यात आली असून पुणे-सोलापुर एक्‍सप्रेस आणि सोलापुर- पुणे इंटरसिटी एक्‍सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. बारामती-पुणे ही गाडी दौण्ड स्थानकापर्यंत धावणार असून ती गाडी दौण्ड- पुणे स्थानकादरम्यान धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पुणे- अंजनी एक्‍सप्रेस दौण्ड कॉर्ड लाइनमार्गे धावणार आहे. उद्या (गुरुवारी) जम्मुतावी- पुणे झेलम एक्‍सप्रेसचे मार्ग बदलण्यात आला असून ती गाडी व्हाया दौंड कॉर्ड लाइनमार्गे धावणार आहे. 6 मार्चला हजरत निजामुद्दीन- वास्को- द- गामा गोवा एक्‍सप्रेसही त्याच मार्गाने पुढे धावणार आहे. तर बेंगलोर- मुंबई उद्यान एक्‍सप्रेस दौण्ड स्थानकावरुन व्हाया दौंड कॉर्ड लाइनमार्गे धावेल. 7 मार्चला मुंबई- बेंगलोर उद्यान एक्‍सप्रेस पाटस स्थानकावरुन पुढे दौण्ड कॉर्ड लाइनमार्गे धावणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : सोलापूरच्या तेजस्विनीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान 


उशिराने धावणार या रेल्वे गाड्या 
नागरकोईल- मुंबई एक्‍सप्रेस 6 मार्चला दोन तास, तर 7 मार्चला सोलापूर- पुणे पैंसेजर एक तास आणि मुंबई- हैद्राबाद एक्‍सप्रेस अर्धा तासाने विलंबाने धावणार आहे. 

loading image