

Solapur Agriculture News Rabi Sowing Covers Only 14000 Hectares Amid Delayed Sowing and Concerns Among Farmers
sakal
सोलापूर : यंदा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ३९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ४.४२ टक्के इतकी आहे. गतवर्षी ऑक्टोबरअखेर १४.०५ टक्के पेरणी झाली होती. अतिवृष्टीमुळे गतवर्षी रब्बी पेरणीला उशिरा सुरुवात झाल्याचा तो परिणाम होता. मात्र, यंदा पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने पेरणी खोळंबली आहे.