
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने विनाकारण चैन ओढणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विनाकारण चैन ओढल्याप्रकरणी २०२४ मध्ये २५५ जणांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ७३ हजार ७१५ रुपयांची दंड वसुली केली आहे. याबाबत सतत जागरूकता मोहीम राबविण्यात येत असून अनधिकृत अलार्म चेन पुलिंग (एसीपी)च्या घटनांना रोक लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.