esakal | Solapur : रेल्वे स्थानकावर दागिने चोरणारा कर्नाटकातून जेरंबद
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested.jpg

Solapur : रेल्वे स्थानकावर दागिने चोरणारा कर्नाटकातून जेरंबद

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. अर्जुन मच्छिंद्र पाटील (वय 30, रा. बापूनगर, शेडम रोड, गुलबर्गा, कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव असून, सीसीटीव्हीच्या मदतीमुळे त्यास पकडणे शक्‍य झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

याबाबत हकिकत अशी की, सीमा मासुलदार (रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर) या 31 जुलै रोजी सोलापूरहून रेल्वेने गुलबर्ग्याला निघाल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचे दागिने चोरले होते. याची दागिन्यांची किंमत 4 लाख 20 रुपये होती. या गुन्ह्याच्या तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपीची ओळख पटविण्यासाठी महिनाभर सीसीटीव्ही तपासले. अखेर त्या संशयित आरोपीची ओखळ पटल्यानंतर तो गुलबर्गा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अर्जुन मच्छिंद्र पाटील यास अटक केली. त्याच्याकडून 4 लाखाचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

हेही वाचा: नागपुरात चर्चेनंतरच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती

कामगिरी सोलापूर लोहमार्गचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर विभाग प्रवीण चौगुले, विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्‍त श्रेयस चिंचवाडे, प्रभारी अधिकारी अमोल गवळी, आरपीएफ निरीक्षक सुनील शर्मा (सीआयबी), यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस नाईक प्रमोद सुरवसे, पोलिस कॉन्सटेबल यशवंत जमादार, सतिश कांबळे, काशीनाथ फुलारी यांनी केली. पुढील तपास सोलापूर लोहमार्ग पोलिस करीत असल्याची माहिती लोहमार्ग प्रभारी अधिकारी अमोल गवळी यांनी सांगितले.

हेही वाचा: कोरोनाचा नियम मोडला अन् 5 वर्ष तुरुंगात झाला 'क्वारंटाईन'

कसून चौकशी

गुलबर्गा येथून अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस यापूर्वीच गुलबर्गा पोलिसांनी घडफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. त्यामुळे या संशयित आरोपीने आणखी किती गुन्हे केले आहेत, याची चौकशी गुलबर्गा पोलिस व सोलापूर लोहमार्ग पोलिस करीत आहेत.

loading image
go to top