esakal | नागपूर : सर्वांसोबत चर्चा करूनच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

नागपुरात चर्चेनंतरच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची नांदीच आहे. गौरी-गणपतींच्या सणांची उत्सवप्रियता ही या संभावित लाटेला पूरक ठरू नये, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी महापालिका आयुक्त डॉ. राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच अप्पर पोलिस अधीक्षक ग्रामीण राहुल माकणीकर, उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

निर्बंधातील शिथिलीकरणामुळे बरेच नागरिक हे कोविड सुरक्षानियमांचे पालन करीत नाही. तसेच सणासुदीच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांत व घराबाहेर पडून खरेदी करत आहेत. परिणामी संक्रमणाची वाढ ही रुग्णसंख्येच्या दुहेरी संख्येत दिसत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला म्हणाल्या.

हेही वाचा: अमरावती : पांढुर्णा येथील गोटमारीत २५० जण जखमी

गणेशोत्सवासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित करूनही नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे तिसरी लाट दारावर येऊन ठेपण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळेतच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याचे मत महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. रस्त्यांमार्फत होणाऱ्या आंतरराज्यीय प्रवाशांची अकस्मातरित्या कोरोना चाचणी करणे तसेच दंडाच्या कार्यवाहीला आणखी गतिमान करणे, ॲटो-रिक्षाव्दारे गर्दीच्या ठिकाणी कोरोनासंबंधी वेळोवेळी जाहीर घोषणा देण्याबाबत उपायुक्त विशेष शाखा बसवराज तेली यांनी सांगितले.

कोविड आनुषंगिक तपासणी जलद करतानाच त्यांचे विश्लेषण गंभीरतेने करण्याचे निर्देशही आरोग्य यंत्रणांना देण्यात आले आहेत. जीवनावश्यक सोडून अन्य गर्दी नियंत्रणासाठी वेळेची मर्यादा कमी करण्यासंबंधी सध्या प्रशासन विचार करीत आहे. लवकरच व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक आणि अन्य घटकांशी बैठकी होणार आहेत.

loading image
go to top