
Flooded Sina River submerging villages in Solapur’s Karmla taluka, cutting off thousands of citizens.
esakal
परतीच्या पावसामुळे सीना नदीला २५ वर्षांनंतर भीषण पूर आला असून करमाळा तालुक्यातील १० गावे पाण्याखाली गेली.
अनेक बंधारे फुटल्याने व रस्ते बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला, शेतीचे मोठे नुकसान झाले.
प्रशासन व स्थानिक तरुणांकडून मदतकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे, सोलापूर जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान करमाळा तालुक्यातील सीना नदीला मोठा पूर आल्याने दहा गावे पाण्याखाली गेली असून हजारो नागरिकांचा संपर्क तुटला आहे. मागील २५ वर्षांत पहिल्यांदाच सीना नदीचे रौद्र रुप पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.