सोलापूर : जुलै महिना सुरू झाला तरी अद्यापही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. सोलापूरसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच आहे. पेरणीसाठी पुरेशा पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
यंदा आठ जूनला मृग नक्षत्राचे आगमन झाले, मात्र मॉन्सून दाखल होण्यास उशीर झाला. उशिराने आलेला मॉन्सूनही मुंबई व कोकणात रेंगाळला आहे. घाटमाथ्यावर काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर जिल्ह्यातही सोलापूर शहर, वैराग परिसर, नातेपुते शहर व उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापही जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे.
पेरणी खोळंबलेलीच
जून अखेरी तुरळक ठिकाणी झालेल्या अल्पशा पावसाने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यात अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केलेली आहे. मात्र, अक्कलकोट व मंगळवेढा तालुक्यात ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीची संकट ओढवले आहे.
लवकरात लवकर चांगला पाऊस न झाल्यास केलेली पेरणीही वाया जाण्याची भीती आहे. ज्यांनी पेरणी केलेली नाही ते शेतकरीही पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मिलिमीटर वाढले पण फक्त सोलापुरात
हवामान विभागाच्या नोंदणीनुसार सोलापूरमध्ये चार जुलैपर्यंत ११०.८०० मिमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे. ३ जुलैपर्यंत १०९.१०० मिमी होता. मात्र, या नोंदी सोलापूर शहरातील पावसाच्या असून जिल्ह्याच्या तुलनेत सेालापूर शहरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या आहेत.
ठळक बाबी
उशिरा पावसामुळे पेरण्या लांबणीवर
पावसाअभावी भाजीपाल्याचा तुटवडा
वातावरण बदलाचा फळबागांवर परिणाम शक्य
बागायती पिकांसाठी अजूनही पावसाची आवश्यकता
तलाव, नाले, ओढे अद्यापही कोरडेच
पाऊस मिलिमीटरमध्ये...
तालुका -जून- जुलै
उत्तर सोलापूर -४०.८ -३८.१
दक्षिण सोलापूर- ३९.०- ४२.७
बार्शी -१६.५ -१७.१
अक्कलकोट २५.३ -२७.८
मोहोळ -२३.८- ३२.३
माढा -१५.७ - ४६.३
करमाळा- २५.०- १९.१
पंढरपूर -२६.३ -६.९
सांगोला -२५.२- ९.४
माळशिरस -३७.०- ५.९
मंगळवेढा -५८.३ -१५.७
एकूण सरसरी -२८.३ -२२.५
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.