Nandurbar Rain Update : जिल्ह्याच्या काही भागास पावसाने झोडपले; शेतकऱ्यांमध्ये समाधान

Rain
Rainesakal
Updated on

Nandurbar Rain Update : आषाढी एकदशीला झालेल्या पावसानंतर तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला होता.

पाऊस न पडल्यास दुबारची वेळ येईल की काय, अशी चिंता सतावत होती. मात्र बुधवारी (ता. ५) दुपारी तीनला तासभर चाललेल्या पावसाने सर्वत्र जलमय केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (heavy rain in nandurbar district news)

जून संपत आल्यावरही पाऊस नव्हता. पूर्ण महिना कोरडा जातो की काय, असे साऱ्यांनाच वाटत असताना २९ जूनला आषाढी एकादशीला पांडुरंग पावले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्त हाकेला साद घालत वरुणराजाला बरसायला भाग पडले. त्या दिवशी सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील पावसाळ्यातील पहिला पाऊस बरसला.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांनी कपाशीसह विविध खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरवात केली. पावसानंतर वातावरण मोकळे झाले होते. पेरणीसाठी संधी दिली देवाने, असे म्हणत शेतकरी पेरणीत गुंतले. पेरणी झाली खरी, मात्र पावसाने पाठ फिरविली.

गेले पाच दिवस पावसाचे वातावरणच नाही. उन्हाचा तडाखा जाणवत होता. शेतकऱ्यांनी पेरणी तर केली मात्र पाऊस न झाल्यास ते बियाणे किडे खाऊन जातील, कोंब काढलेले बियाणे कोमेजून जाईल, त्यामुळे पुन्हा दुबार पेरणीची वेळ येते की काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला होता. काहींची पेरणी आटोपली होती, काहींनी पेरणी थांबविली, तर काही मोठ्या हिमतीने पेरणी करतच होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain
Rain : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट; राज्यातही कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत

मात्र साऱ्यांचेच लक्ष आकाशाकडे होते. पाऊस यावा म्हणून शेतकरी आर्त हाक देत होते. त्यातच बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक उकाडा होऊ लागला. पावसाचे वातावरण तयार झाले. सुमार दीड तास जोरदार बरसला. जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाला. शेतकऱ्यांना पावसाने दिलासा मिळाला.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

गेल्या तीन महिन्यांपासून अनेक गावे व शहरातील काही वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन खासगी टॅंकरद्वारे पाणी उपलब्ध करून काम भागवावे लागत होते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दुर्लक्ष करीत होते. त्यातच नंदुरबार शहरालगत अनधिकृत बोअरवेलधारकांवर व टॅंकरधारकांवर तहसीलदार पुलकित सिंह यांनी कारवाई केल्याने अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

पाण्यासाठी टॅंकर मिळत नव्हते. काही लपूनछपून पाणीपुरवठा सुरू ठेवला होता. मात्र त्यांना मूह मांगे दाम द्यावा लागत होता. मात्र आषाढी एकादशीला झालेल्या पावसानंतर दोन-तीन दिवसांत बोअरवेलची काही अंशी पाणी पातळी वाढली. त्यातून पिण्यापुरते का असेना पाणी येण्यास सुरवात झाली. या पावसामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Rain
Nanded Rain Update : पावसाच्या आगमनामुळे काहीसा दिलासा; शेत शिवारात साचले पाणी

शहादा येथे मुसळधार सोयाबीन पिकाला जीवदान

शहादा शहर व परिसरातील भागात बुधवारी (ता. ५) दुपारी सुमारे अर्धा तास मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. चक्क महिनाभर उशिराने पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले आहे. ग्रामीण भागात अजून पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने बळीराजाने पेरणीस घाई करू नये, असे कृषी विभागाने कळविले आहे. बुधवारच्या मुसळधार पावसामुळे अर्ध्या शहरातील रस्ते पाण्याखाली होते.

सात जूनला पावसाचा सुरवात होते. महिन्याभरात तुरळक दोन-तीन वेळा पाऊस झाला. रस्ते ओले झाले होते, मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने बळीराजा पावसाकडे नजर लावून बसला आहेत. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. सोयाबीन, कपाशी आदींची पेरणी, लागवड झाली आहे.

पाच-सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. बुधवारच्या मुसळधार पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. तसेच पिकांचे जीवदान मिळाले आहे. शहरातील अनेक भागांत पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप आले होते. विजयनगर, श्रमिकनगर, मेन रोड, नियोजित ट्रक टर्मिनस जागा, गांधीनगर परिसरात पाणी थांबल्याने गुडघाभर पाणी साचले होते.

Rain
Nashik Rain Alert : जिल्ह्यात आज मध्यम,उद्या जोरदार पावसाची शक्यता

विजयनगर, गजानन महाराज मंदिर, परिसरात पाण्याने कहर केलेला होता. गरीब नवाज कॉलनीसह अर्ध्या भागात रस्त्यावर पाणी थांबलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह आवारामध्ये गुडघाभर पाणी थांबलेले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात नेहमीच पाणी थांबत असते. बांधकाम विभागाच्या विश्रामगृह असूनदेखील या ठिकाणी पाणी काढण्याची कुठली सोय नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.

ग्रामीण भागातही हजेरी

शहरासह तऱ्हाडी, भादा, पिंगाणा, तिखोरा, ब्राह्मणपुरी, अवगे, जुणवणे, कहाटूळ, कवठळ, लांबोळा, नांदरखेडा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. पाऊस झाला असला, तरी अजूनही काही भागात पेरणीयुक्त पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असेदेखील शहादा तालुका कृषी विभागाकडून कळविण्यात आलेले आहे. पेरणी उशिरा होत असल्याने शेतकरीदेखील चिंताग्रस्त झाला आहे.

Rain
Rain Snake Bite Precaution : आला पावसाळा, सर्पांपासून सांभाळा! प्रशिक्षित सर्पमित्रांनाच बोलवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.