esakal | Solapur: पाऊस चांगला झाला असला तरी; जलसाक्षरता चळवळ व्यापक करा
sakal

बोलून बातमी शोधा

जलसाक्षरता चळवळ

सोलापूर : पाऊस चांगला झाला असला तरी; जलसाक्षरता चळवळ व्यापक करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी पाणी जपून वापरले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. जलसाक्षरतेची व्यापक चळवळ करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

जिल्हा परिषदेत जलसाक्षरतेच्या दृष्टीने झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस यशदाचे उप महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपस्थित होते.

हेही वाचा: सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालयात सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सीईओ स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणमध्ये येतो. उजनी धरणावर बराचसा भाग अवलंबून आहे. अशा स्थितीत शेतीचे पाणी वापरण्याबाबत काळजी घ्यायला हवी. दररोज पाण्याचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. विजेच्या बचतीबरोबर पाण्याची देखील बचत होणार आहे. यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, पाण्याची साक्षरता होण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.

जनजागृतीमुळे लोक जलसाक्षर होतील. साक्षरतेशिवाय पाण्याचे महत्त्व समजणे अवघड आहे. भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलसाक्षरतेशिवाय पर्याय नाही. विशेषत सोलापूर जिल्ह्यास जलसाक्षरतेची खुप गरज आहे. जलनायक, जलदूत यांची भूमिका महत्त्वाची आहे. जलसाक्षरतेची व्यापक चळवळ उभारणेसाठी जलनायकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

loading image
go to top