Solapur Rainfall 2025
esakal
-विठ्ठल एडके
सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यात (Solapur Rainfall 2025) ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोकणापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १७५ मिमी (१६२ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात २७४ मिमी (१७९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. कोकणात ऑगस्टमध्ये सरासरीच्या १०३ व सप्टेंबरमध्ये १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या ९४ टक्के तर सोलापूर जिल्ह्यात १३०.८० मिमी पावसाची (Solapur Weather Update) नोंद झाली आहे.