सोलापूर : तीन तालुक्‍यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

अक्‍कलकोट तालुक्यात सर्वांत जास्‍त पावसाची नोंद
Solapur rains rainfall recorded three talukas
Solapur rains rainfall recorded three talukassakal

सोलापूर : शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र हजेरी लावली. अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा या तीन तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह या तीन तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, जेऊर, करजगी, वागदरी, चपळगाव, किणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. अक्कलकोट महसूल मंडळात ५१.५ मिलिमीटर, सोलापूर महसूल मंडळात २३.८ मिलिमीटर पाऊस झाला.

मोहोळ तालुक्यातील मोहोळ, कामती, सावळेश्वर या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. सावळेश्वर महसूल मंडळात ३८.८ मिलिमीटर, कामती महसूल मंडळात २० मिलिमीटर, मोहोळ महसूल मंडळात १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे महसूल मंडळात २५ मिलिमीटर, हुलजंती महसूल मंडळात ३२.३ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत ६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ऊस गाळपाला अडचणी

सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ऊस गाळपासाठी जिल्हा प्रशासन, साखर कारखाना युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. अवकाळी पावसामुळे ऊसतोड व ऊस वाहतूक करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com