Solapur : रिकव्हरी बेसचा विचार करता माळेगाव भावाच्या बाबतीत राज्यात आग्रेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब तावरे

Solapur : रिकव्हरी बेसचा विचार करता माळेगाव भावाच्या बाबतीत राज्यात आग्रेसर

माळेगाव : रिकव्हरी झोन असलेल्या कोल्हापूर भागातील दुधगंगा-वेदगंगा कारखान्याने गतवर्षीच्या गळीत उसाला १२.९९ रिकव्हरीला अंतिम दर प्रतिटन ३११५ रुपये दिला. दालमिया शुगर मिलने १३.३० रिकव्हरीला ३०९७ रुपये दर जाहिर केला, तर सोनहिरा कारखान्याने १३.२० रिकव्हरीला ३१३३ रुपये दर दिल्याची नोंद झाली. त्या तलुनेत माळेगावने १२.०४ रिकव्हरी कमी असतानाही ३१०० रुपये अंतिम ऊस दर जाहिर केला. याशिवाय माळेगावने हिरवळीच्या खतांसह विविध अनुदानाच्या रुपाने सभासदांना सुमारे ६ कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. परिणामी रिकव्हरी बेसचा विचार करता माळेगाव कारखाना भावाच्या बाबतीत राज्यात आग्रेसर ठरवा आहे, असा दावा संचालक नितीन सातव, अनिल तावरे यांनी केला.

माळेगाव कारखान्याने गतवर्षी (सन २०२१-२२) हंगामात गळीत झालेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये अंतिम दर जाहिर करीत रिकव्हरी झोन असलेल्या कोल्हापूर विभागातील कारखान्यांच्या दराशी बरोबरी केली. अर्थात माळेगावने अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या संचालक मंडळाने १२.०४ इतकी रिकव्हरी कमी असतानाही ३१०० रुपये अंतिम ऊस दर देण्याचे ठरविले. शिवाय करारपद्धतीने घेतल्या गेटकेनधारकांना एफआरपीपेक्षा अधिकचे प्रतिटन २८५० रुपये देण्याचे माळेगावने सांगितले आहे. असे असताना सोमेश्वर कारखान्याने गेटकेन उसाचा दर विचारात घेता सरासरी ऊस दराचे सूत्र पुढे करीत माळेगावपेक्षा ३१ रुपये अधिकचे दिल्याचे सांगितले. त्याचे माळेगावच्या कार्य़क्षेत्रात पडसाद उमलटे.

तोच धागा पकडत संचालक नितीन सातव, अनिल तावरे यांनी माळेगावच्या ऊस दराचा चढता आलेखच थेट पत्रकारांसमोर मांडला. यावेळी त्यांनी कोल्हापूर भागात ३१०० पेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांच्या बरोबरीचा माळेगावचा अंतिम भाव आहे, याकडे लक्ष वेधले. दुधगंगा-वेदगंगा कारखान्याने उसाला १२.९९ रिकव्हरीला अंतिम दर प्रतिटन ३११५ रुपये दिला. दालमिया शुगर मिलने १३.३० रिकव्हरीला ३०९७ रुपये दर जाहिर केला, तर सोनहिरा कारखान्याने १३.२० रिकव्हरीला ३१३३ रुपये दर दिल्याची नोंद आहे. त्या तलुनेत माळेगावने १२.०४ रिकव्हरी असतानाही ३१०० रुपये अंतिम ऊस दर जाहिर केला आहे. याशिवाय माळेगावने हिरवळीच्या खतांसह विविध अनुदानाच्या रुपाने सभासदांना सुमारे ६ कोटी रुपयांचा लाभ दिल्याचे संबंधित संचालकांनी स्पष्ट केले. दरम्यान, श्री. सातव म्हणाले, `` माळेगावने याआगोदर सभासदांच्या बॅंक खात्यावर शंभर रुपये कांडे पमेंटसह २८८० रुपये प्रतिटन जमा केले आहेत.

३१०० रुपये अंतिम भावातील प्रतिटन २२० रुपयांची उर्वरित रक्कम ही दिवाळी सणाच्या मुहुर्तावर (१० आॅक्टोबर पर्यंत) एकरकमी दिली जाईल. तसेच गेटकेनधारकांनाही प्रतिटन ७० रुपये दिले जातील. त्यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांची तरतूद प्रशासनाने केली. या प्रक्रियेत साखर कामगारांनाही चांगला अर्थिक फायदा दिला आहे. दोन वर्षांपासून कामगारांना रजेच्या पगाराच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपये दिले. गतवर्षी विक्रमी असे १५ लाख टनापर्यंत उसाचे गाळप झाले. तसेच डिस्टरली, वीज निर्मितीमध्येहीअधिकचे उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल कामगारांना १५ दिवसांचे बक्षिसपर वेतन १ कोटी ४० लाख रुपये दिले. याशिवाय त्यांना १२ टक्के वेतनवाढही लागू केली आहे. यंदाही दिवाळीच्या निमित्तानेही बोसनची परंपरा कायम ठेवली जाणार आहे.

मेडीक्लेमचा १६ कोटींचा फायदा..!

माळेगाव कारखान्याने अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांच्या अधिपत्याखाली सभासदांसाठी महत्वकांक्षी मेडीक्लेमची योजना आंमलात आणली आहे. विशेषतः या योजनेचा माध्यमातून दोन वर्षात २२८९ सभासदांचे तब्बल १६ कोटी रुपयांचे वैद्यकिय क्लेम मंजूर झाले आहेत. अर्थात ही योजना अध्यक्ष तावरे, नितीन सातव आदी संचालकांनी राबविल्याने तब्बल १६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे वैद्यकिय खर्चासाठी जाणारे थाबले आहेत. सहाजिकच त्याचा शेतकऱ्यांना प्रापंचिकदृष्ट्या फायदा झाला आहे, अशी माहिती संचालक अनिल तावरे यांनी दिली.