Why did Rohini Paradhye die by end life
esakal
Reel Star Rohini Paradhye Case in Solapur : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या २५ वर्षीय प्रसिद्ध रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाने (Hotel Gram Panchayat owner death news) व्यवसाय करणाऱ्या रोहिणी यांनी आपल्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.