सोलापूर : दीडशे रुपयांत करा नोंदणी विवाह १५० | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

सोलापूर : दीडशे रुपयांत करा नोंदणी विवाह

सोलापूर : मोठा मंडप, बॅण्डबाजा, आहेर, वऱ्हाडी असा विवाह करण्याची पध्दत आहे. स्वस्तात पण कायदेशीर विवाह अवघ्या १५० रुपयांत होऊ शकतो. विशेष विवाह नोंदणी कायदा-१९५४ अंतर्गत महिन्याची नोटीस देऊन पुढील ६० दिवसांत विवाह लावून दिला जातो.नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून अनुदानही मिळते. दरम्यान, नोंदणी विवाहासाठी वधू (मुलगी) किंवा वर (मुलगा) संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावेत.

त्याशिवाय त्यांना त्या जिल्ह्यात नोंदणी विवाह करता येत नाही. दुसरीकडे चुलत, मावस सोडून सख्या नात्यातील दोघेही नसावेत, असा निकष आहे. वास्तविक पाहता आई-वडिलांचा विरोध असल्याने अनेकजण पळून जाऊन विवाह करतात, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नोंदणी विवाह करण्यासाठी ३० दिवसांची नोटीस बंधनकारक आहे. जेणेकरून पुढे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होत नाहीत, हा त्यामागील हेतू आहे.

विवाहावेळी साक्षीदार हे मुला-मुलींचे पालकच असावेत, असे काहीही नाही. ते तीन साक्षीदार मुला-मुलींना ओळखत असणारे किंवा त्यांच्या नात्यातील असले तरी चालतात. विवाहावेळी मुलगा-मुलगी सज्ञान असावेत, असाही नियम आहे. सर्व नियम, निकषांची पूर्तता झाल्यानंतर वधू-वरांनी ठरविलेल्या तारखेला संबंधित मुद्रांक शुल्क विभागाच्या उपनिबंधक कार्यालयात विवाह लावून दिला जातो.

नोंदणी विवाहाच्या अटी व शर्ती

ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी संबंधित कार्यालयास ऑनलाइन नोटीस पाठवावी. नोटीस पाठविल्यानंतर पुढील ३० दिवसांत कोणाचीही त्यासाठी हरकत नसावी. जवळचे नातेवाईक (भाऊ-बहिण) किंवा रक्तातील कोणत्याही व्यक्तीसोबत विवाह करता येणार नाही. हरकतीचे ३० दिवस सोडून पुढील ६० दिवसांत वधू-वराने सूचविलेल्या तारखेला विवाह लावला जातो. नोंदणी शुल्क १५० रुपये; विवाहावेळी ओळखीचे किंवा नात्यातील तीन साक्षीदार आवश्यक

जिल्ह्यासाठी दक्षिण सोलापूर तहसीलच्या आवारातील मुद्रांक शुल्क कार्यालयात नोंदणी विवाहाची सोय आहे. त्याठिकाणी विशेष विवाह नोंदणी कायदा-१९५४ नुसार नोंदणी विवाह करता येतो.

- गोविंद गिते,मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर

Web Title: Solapur Register Marriage Rs 150

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..