
सोलापूर: शहरात ध्वनिप्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवून मिरवणुकांमध्ये आवाजाची मर्यादेचे उल्लंघन करून डीजे, डॉल्बी वाजवले जातात. या विरोधात हिंदूराष्ट्र महासंघातर्फे डीजेमुक्त सोलापूर उपक्रमांतर्गत माणिक चौकातील आजोबा गणपती येथे मंगळवारी डीजेमुक्तीसाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.