Solapur News: ‘आमचा एकमेव रस्ताच खोदला!’; ७०० नागरिकांचा खड्ड्यात ठिय्या, खासदार प्रणिती शिंदे आंदोलनात उतरल्या

700 Solapur Residents Protest After Only Road Is Dug Up: एकमेव रस्ता खोदल्याने सातशे कुटुंबांची कोंडी; गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसह रहिवासी खड्ड्यात ठिय्या, खासदार प्रणिती शिंदे आघाडीवर
Solapur Road Dispute Sparks Protest As 700 Residents Sit In Dug Up Road MP Praniti Shinde Joins Protest For Access

Solapur Road Dispute Sparks Protest As 700 Residents Sit In Dug Up Road MP Praniti Shinde Joins Protest For Access

sakal

Updated on

सोलापूर : बॉम्बे पार्कजवळील गणेश बिल्डर स्कीम क्रमांक तीनमधील सुमारे सातशे नागरिकांच्या ये-जा करण्याचा एकमेव रस्ता खोदून बंद करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी खोदलेल्या रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांनीही सहभाग घेतला. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसह रहिवासी रस्त्याच्या खड्ड्यात बसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तब्बल चार तासांनंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. दरम्यान, रात्री उशिरा महापालिकेने तीन जेसीबी लावून तात्पुरत्या वाहिवाटीसाठी रस्ता सुरू करून दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com