
Solapur rural police destroy 999 kg of ganja in a large-scale operation supervised by police superintendents.
Sakal
सोलापूर : दीड-दोन वर्षांपासून पोलिस ठाण्यांमध्ये पडून असलेला ९९८ किलो ५२६ ग्रॅम गांजा गुरुवारी (ता. १६) नष्ट करण्यात आला. महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत तो मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला.