esakal | Article: असलं कसलं हे द्वेषाचं राजकारण ?
sakal

बोलून बातमी शोधा

चांगभलं logo

असलं कसलं हे द्वेषाचं राजकारण ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आपल्या महाराष्ट्राला लई मोठ्या संस्कृतीचा वारसा हाय... पूर्वीच्या काळी राजकारण करताना नेते एकमेकांबद्दल आदरभाव ठेवत असतं... अलिकडील काळात ही संस्कृती लोप पावत चालल्याचं दिसून येऊ लागलं हाय... राजकारणावेळी राजकारण नंतर मात्र एकमेकांबद्दलची भावना आपुलकीची, प्रेमाची, विश्‍वासाची अन्‌ आदराचीच असायची... त्या वक्ताला सहृदयी माणसं राजकारणात हुती... पन आता लईच वंगाळ झालंया... तू माझ्या गावात ये बगतोच... मी बी आलो बग आता काय करतुसं... असं एकमेकांना आव्हान देण्यात येऊ लागलंया... सामान्य मानसं असलं कसलं राजकारण म्हनू लागल्याती..?

राज्यात महाईकास आघाडी सरकार सत्तेवर आलं... काँग्रेस, राष्ट्रवादी अन्‌ शिवसना असं तीन पक्ष एकत्र आल्याती... निवडणुकीपूर्वी हुती ती भाजप-सेनेची युती सरकार स्थापनेयेळी तुटली... युती तुटल्यानंतर सेना भाजपवर अन्‌ भाजप सेनेवर असं नेहमीच कुरघोड्याचं राजकारण करु लागल्याचं दिसू लागलंया... राज्याच्या राजकारणात एकमेकाइरोधात जसं चाललंया त्येला सोलापूरबी अपवाद नाय... सोलापुरात तर लईच येगळं होऊ लागलंया... वरदहस्त असंल नाहीतर काय ? शिवसेनेचे जिल्हा परमुख बरडे सायब जरा जहालच मानूस म्हना ना... मूळ शिवसैनिकच हायती ते... त्येंनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादाला सोलापूरचं मरिआई चौक वलांडून दाखवाच बघतूया असं आव्हान दिलतं... त्येचं कारण म्हंजी दादानं सोलापुरात केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांचा म्हंजी शिवसेनेचे परमुख उद्धव सायबांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला हुता... पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावला हुता...

हेही वाचा: दोन दिवसांत 'पेट'ची Merit List प्रसिध्द होणार; तब्बल 650 जागांसाठी परीक्षा

पण पुतळ्याची अवहेलना झाल्याचं काहीजणांचं म्हणणं हाय ... उद्धव सायब म्हंजी शिवसैनिकांचं आराद्य दैवत... बरडे सायबांचा तर लईच जवळचा संबंध... त्येच्यामुळं बरडे सायबाचं पित्त खवळलं म्हना ना... श्रीकांतदादा म्हंजी काय कमी हाय का ? तेबी राजकारणात लईच पोचलेलं नेता हाय... सादं सुदं नाय ते तर पैलवान गडी... ‘त्येनंबी आलं अंगावर अन्‌ घेतलं शिंगावर’च केलं ना राव ! सोलापुरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दादा गाड्या भरून माणसं घेऊवन आलं अन्‌ बरडे सायबाच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं... पन ते बरडे सायब म्हटलं मी बी जवळ्याला येतुया... त्यात त्येंनी डायलॉगबी मारलाय...

हेही वाचा: सांगोला : रतनकाकी प्रथमच राजकीय व्यासपीठावर

अकेले आते है वो शेर और झुंडसे आते हे वो... या डायलॉगमुळं आता वातावरण पुना लईच पेटलं हाय... ! फुडं काय होतंय ते बघाव लागंल... पण राजकारण करताना दोन्हीबी पक्षाच्या परमुखांनी असलं वक्तव्य करणं म्हंजी जरा येगळंच वाटतंया... एकमेकांबद्दल द्वेषाचं राजकारण करण्यापेक्‍शा जरा सबुरीनं घेतलं तर बरं असं वाटतंया..! सोलापूर जिल्ह्यात असलं वंगाळ राजकारण होऊ लागलंया. त्येपेक्‍शा इकासाचं जरा बघा म्हणावं !

- थोरले आबासाहेब

loading image
go to top