Solapur : आठशे किलो पेढ्यांची विक्री; दसऱ्यासाठी मिठाई खरेदीचा उत्साह; खवा खरेदीला प्राधान्य

यावर्षी देखील बाजारात पेढ्याची विक्रमी उलाढाल सुरु झाली आहे.
sweet
sweetsakal

सोलापूर - नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्यासाठी बाजारात पेढ्याची विक्रमी विक्री सुरु झाली आहे. जेवणात गोडधोड म्हणून श्रीखंडाच्या पाठोपाठ खवा घरी आणून गोड पदार्थ घरीच करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. दसरा म्हटले की गोडधोड खाण्याचा दिवस मानला जातो. नऊ दिवसाचे उपवास संपल्यानंतर दसऱ्याला आवर्जून जेवणात गोडधोड पदार्थ असतो. या शिवाय दसऱ्याची पूजा, नव्या वाहने, वस्तु व गृहप्रवेश आदी कार्यक्रमात पेढा हा लागतोच. शेजारी, मित्रांना नव्या खरेदीचा पेढा देण्याची पध्दत असते. त्यासाठी मलई व केसर फिका पेढा अधिक प्रमाणात विकला जातो. मिठाई बाजारात पेढ्याची विक्री अगदी विक्रमी असते.

यावर्षी देखील बाजारात पेढ्याची विक्रमी उलाढाल सुरु झाली आहे. एक दिवस आधीच बाजारात खरेदीसाठी आज गर्दी झाली होती. या दोन दिवसात पेढेविक्रीची उलाढाल सर्वाधिक होते. केसर पेढा व मलाई फिका पेढ्याची विक्री सर्वाधिक होते. पूजेसाठी व खरेदीचा आनंद व्यक्त करण्यासाठी हमखास पेढा वापरला जातो.

दसऱ्याला श्रीखंडाचा जेवणात बऱ्यापैकी वापर होतो. पण मागील काही वर्षात खवा विकत आणून गुलाब जामून, खवा पोळी असे पदार्थ घरीच करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या निमित्ताने नव्या पिढीतील महिलांना नवे पदार्थ करण्याची संधी मिळते. तसेच जास्तीचे करून मुलांना दोनतीन दिवस गोड पदार्थ देता येतात.

sweet
Solapur News: ‘ठेका घेतलाय काय’ अजित पवारांचे आमदार मराठा आंदोलकांवर भडकले

ठळक बाबी

अंदाजे ८०० किलो पेढ्याची विक्री होण्याचा अंदाज

श्रीखंडाला जेवणात मान

जेवणात खवा विकत आणून गोड पदार्थ करण्याचा मोठा ट्रेंड

दसऱ्याला बाजारात पेढ्यांना सर्वाधिक मागणी असते. केशर व मलाई फिका पेढा अधिक प्रमाणात विकला जातो. नवरात्रात नऊ दिवसाच्या उपवासानंतर गोड पदार्थ करण्यासाठी खव्याची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

- दिनेश नरखेडकर, संचालक, काका हलवाई, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com