समृद्धी पवार
समृद्धी पवारSakal

समृद्धी पवारचे राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदकासह ’चौफेर’ यश

एक सूवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा चार पदकांची लायलूट

करकंब : अमरावती येथे झालेल्या सब ज्युनिअर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अरण (ता. माढा) येथील समृद्धी शिवप्रसाद पवार हिने नवीन विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि एक कांस्य, अशी एकूण चार पदके पटकावली आहेत. त्यामुळे अरणसह सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव देशाच्या क्रीडाक्षेत्रात उज्वल केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
२१ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत अमरावती येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत २६ राज्यातील प्रत्येकी एकशे चार मुले आणि मुली स्पर्धकांनी भाग घेतला होता.

त्यामध्ये महाराष्ट्रातून अरण येथील संत सावता माळी विद्यालयातील समृद्धी आणि रोशन दुर्गे ह्या दोघाजणांची निवड झाली होती. समृद्धीने सब ज्युनिअर स्पर्धेतील तीस मीटर प्रकारात ३६० पैकी ३४९ इतके विक्रमी गुण मिळवून सूवर्णपदक पटकाविले. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धेत समृद्धीचे गुण ६७३ तर राज्यस्तरीय स्पर्धेत ६८६ गुण राहिले होते. स्पर्धेप्रमाणेच तिच्या गुणांकनाचाही आलेख चढताच राहिला आहे. वीस मीटर प्रकारातही ३६० पैकी ३४५ गुण मिळवीत ती झारखंडच्या वर्षा खोलको हिच्या बरोबर राहिली.

समृद्धी पवार
SRH Player Retention : ऑरेंज आर्मीचा जम्मूच्या पोरांवर विश्वास

पण वर्षाचे ’एक्‍स शूट’ अकरा तर समृद्धीचे ’एक्‍स शूट’ नऊ असल्याने समृद्धीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मिश्र दुहेरीतही आपल्याच प्रशालेतील रोशन दुर्गे याच्यासह तिने उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, येथील स्पर्धकांचा पराभव करत रौप्य पदक पटकाविले. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे सांघिक नेतृत्व करताना तिने नाशिक येथील ऋतुजा पवार व साक्षी ताटे तर अमरावती येथील कुमकूम मोहोड यांच्या साथीने पश्‍चिम बंगाल, गुजरात आणि तामिळनाडू यांचा पराभव करत राज्याला ब्राँझ पदक मिळवून दिले आहे. तिला क्रीडा शिक्षक सावता घाडगे व एकलव्य अकादमीचे प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

शिष्यवृत्ती परीक्षेतही दैदिप्यमान यश
ऑगष्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल याच आर्चरी राष्ट्रीय स्पर्धेच्या दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यामध्येही समृद्धीने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तीनशे पैकी २५० गुण मिळवून ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. इयत्ता पाचवीमध्येही ती शिष्यवृत्ती परीक्षेत २६० गुण मिळवून राज्यात अकरावी आली होती.

मी सब ज्यूनिअर आर्चरी स्पर्धेत देशात सर्वोत्तम ठरले याचा आनंद आहेच. पण मला आता येत्या एक-दीड महिन्यात होणाऱ्या यापेक्षा आव्हानात्मक ज्युनिअर आणि सिनिअर स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित करून त्यात अशाच प्रकारचे यश मिळवायचे आहे.
- समृद्धी पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com