Historic Temple Renovation Maharashtra
esakal
-प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर : बाळीवेस येथील संत नामदेव महाराजांच्या सुमारे शंभर वर्षे जुन्या मंदिराचा गेल्या वर्षभरापासून जीर्णोद्धार सुरू आहे. जुन्या मंदिराच्या जागी काळ्या पाषाणातील भव्य मेघडंबरी असलेले नवे मंदिर उभारण्यात येत (Balives Sant Namdev Temple new construction) आहे. या मंदिरात बालस्वरूपातील संत नामदेव महाराजांसह विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती कृष्णशिळेत साकारण्यात येत आहेत. शहरातील संत नामदेव महाराजांचे हे एकमेव मंदिर असून, बालस्वरूपातील महाराजांची मूर्ती हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे एक कोटी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.