Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!

Drug adiction Free National Award:नशा मुक्त नॅशनल अवार्ड २०२४ चा सन्मान सोहळा नवी दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता
Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!
येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!sakal
Updated on

Yermala: सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात सामाजिक कार्यकर्ता पदावर कार्यरत असलेले येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित.

आयुष इन्स्टिट्यूट व रिसर्च सेंटर व्यसनमुक्ती केंद्र इंटिग्रेटिव्हर्स फोरम हेमाद्री आयुर्वेद फार्मसी,लाईफ लाईन वेल्फेअर सोसायटी व आयुष नशा मुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे भव्य संमेलन व नशा मुक्त नॅशनल अवार्ड २०२४ चा सन्मान सोहळा नवी दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता.

Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!
Solapur Crime News : धक्कादायक! दारूसाठी डोक्यात दगड घालून मित्राचा खून, आरोपी अटकेत

कार्यक्रमात सोलापूर समाज कल्याण विभागात सामाजिक कार्यकर्ता पदावर कार्यरत येरमाळा येथील रहिवासी सच्चिदानंद बांगर यांना नशामुक्त नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री खासदार रामदास आठवले होते.

या कार्यक्रमास आयुष्यमान भारत गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एच ई बसेम एफ हेलिस कौन्सेलर एमबॉसी ऑफ द स्टेट पॅलेस्टीन अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे,धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर,खासदार राजेंद्र वाजे,प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!
Solapur News : जि. प. शिक्षण विभाग अलर्ट;गणवेश बंधनकारक, मोबाईल वापरावर निर्बंध

नशामुक्ती साठी कार्य करणारे देशातील विविध एनजीओ आणि संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी यांना नशामुक्त नॅशनल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.त्यामध्ये समाज कल्याण विभाग जि.प. सोलापूर विभागात कार्यरत असणारे सच्चिदानंद बांगर हे स्वतःची नोकरी सांभाळून सामाजिक कार्याची आवड असल्याने जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे गटप्रवर्तक यांच्यासाठी नशा मुक्तीच्या कार्यशाळा घेतल्या व व्यसनमुक्त होऊ इच्छिनाऱ्या लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्त केल्याबद्दल हा अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर संदीप तांबारे यांनी नशा मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक गोष्टींमध्ये ड्रग्स, दारू,गांजा,अफीम इत्यादी नशेच्या पदार्थापासून लांब राहणं व समाजाला यापासून दूर ठेवणे ही आपणा सर्वांची मोठी कसोटी आहे हे सांगतानाच आतापर्यंत तीस हजार लोकांना नशा मुक्त केल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!
Sola Somvar Vrat: निज श्रावणात सोळा सोमवार व्रत प्रारंभ! अधिक मासात व्रतास निर्बंध, 14 वर्ष केले जाते व्रत

डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी तंबाखूमुळे कितीतरी लोकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे.त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून तंबाखू सोडावी असे आवाहन केले तर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी योग ही भारतासह सर्व जगाला मिळालेली मोठी देणगी असल्याचे नमूद करत योगासनांचा सराव करून मनावर ताबा मिळवणे व नशे पासून लांब राहून शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नुस्खे सांगितले. खासदार वाजे यांनीही व्यसनापासून लांब राहण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नशा मुक्तीवर बोलताना यमक जुळवत शीघ्र कविता सादर करून सर्व उपस्थितांचे मने जिंकली व नशामुक्ती साठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक करून हे कार्य यापुढे असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर संदीप तांबारे व जुही सब्रवाल दिल्ली यांनी येथे केले होते. या कार्यक्रमांसाठी देशातील विविध मान्यवर,एनजीओ संस्थेचे पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.

Solapur : येरमाळा येथील सच्चिदानंद बांगर,नशामुक्त नॅशनल पुरस्काराने सन्मानित!
Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.