
Solapur News: शाळेच्या फी वरून आ.अवताडेचा प्रश्न,मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले
मंगळवेढा : खाजगी शाळातील फी वरून विद्यार्थाना डांबून ठेवल्या प्रकरणी सत्ताधारी आ.समाधान आवताडे यांनी विचारलेल्या लक्षवेधीत विरोधी पक्षनेते अजित पवार सहभागी होत शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरून दिलेल्या उत्तरावर दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाघोली येथील मॅक्सीकाॅन इंटरनॅशनल स्कूल वाघोली या खाजगी शाळेने फी आकारणी करून 200 विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्या प्रकरणाचा प्रश्न आ.समाधान आवताडे यांनी मांडत अशा घटनेने विद्यार्थ्यांच्या बालमनावर मानसिक परिणाम होतो यावरून शिक्षणमंत्र्याला धारेवर धरले आ. अवताडे यांनी फी साठी विद्यार्थ्याला डांबून ठेवणे
वर्गाबाहेर थांबवणे यासाठी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना शासन निर्णय काढून फी आकारणीबाबत सक्त सुचना देणार का ?
विद्यार्थ्यांना खाजगी शाळांनी वाईट वागणूक दिल्यास त्या व्यवस्थापनावर व मुख्याध्यापकावर फौजदारी कारवाई करणार का ? आणि त्या शाळांची मान्यता रद्द करणार का ? खाजगी शाळांसाठी शासन निर्णय किती दिवसात निर्गमित करणार असा प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाचे उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की या खाजगी शाळेमध्ये 200 विद्यार्थ्याला डांबून ठेवण्यात आले नसून शाळेच्या वेळेनंतर एका खोलीमध्ये बसवून पालक आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.
शाळातील फी त्यांच्या व्यवस्थापनाने निश्चित केले असते त्यामुळे ज्यांना फी भरता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी त्याच्या शेजारी असलेल्या शासकीय शाळेत व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा.
फी च्या आकारणी वरून कोविड काळात फी साठी विद्यार्थाची अडचण होऊ नये म्हणून शाळा सोडल्याचा नसतानाही प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. (Latest Pune News)
शाळेच्या फी आकारणीवर एक कमिटी नेमून असे प्रकार घडू नये यासाठी संस्था प्रतिनिधी व विद्यार्थी संघटना यांच्यात बैठक घेऊ जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडवणूक होता कामा नये. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील प्रकरणाचा पोलिसात गुन्हा दाखल केला होता
परंतु या प्रकरणात पालक जबाब देण्यासाठी पुढे आला नसल्यामुळे तो गुन्हा बंद केला. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सदरचा गुन्हा हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे लेखी उत्तरात दिल्याचा मुद्दा लावून धरला वास्तविक पाहता वाघोली या कार्यक्षेत्रामध्ये लोणंद पोलीस ठाणे येत नाही हे निदर्शनास आणून दिल्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून
चुकून लोणंद असे लिहिले गेले असे सांगून या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली. आ. समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात आ. राजेश टोपे व आ राहुल कुल यांनी देखील सहभागी नोंदवत खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चव्हाट्यावर आला.(Latest Marathi News)