Pune Crime News : पुण्यातील पेठेत कोयत्याचा थरार! भरदिवसा व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

Pune Crime News : पुण्यातील पेठेत कोयत्याचा थरार! भरदिवसा व्यापाऱ्याचे ४७ लाख लुटले

पुण्यात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठेत दिवसाढवळ्या दोन तरुणांनी व्यापाराला लुटल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील नाना पेठेतील आझाद आळीमधून टू व्हीलर वरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून व्यापाऱ्याची पैश्याने भरलेली पिशवी पळवली. दरम्यान समर्थ पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकी वर जात होता. यादरम्यान नाना पेठ येथील आजाद आळी मधून बाहेर येताना दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी घेऊन ते दोघेही पसार झाले.

व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Pune News