
सोलापूर : सोलापुरात प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण व सुविधा देण्याची गरज आहे. त्यांच्या खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी एमसीएतर्फे राज्यात चार ठिकाणी विभागीय क्रिकेट अॅकॅडमी स्थापन करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सोलापुरात विभागीय क्रिकेट अॅकॅडमी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या महापालिकेसह तीन जणांचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.