

Solapur Cold Wave Alert Issued
Sakal
Solapur: हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सध्या सोलापूर व परिसरात थंडीची लाट सुरू आहे. थंडीच्या लाटेत मानवी आरोग्य, शेती आणि पशुधनाची काळजी कशी घ्यावी? याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या कालावधीत त्वचेचा ओलावा टिकवून ठेवा, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या आहेत.