
सोलापूर : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून २४ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तरूणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या डायरीतील नोंदीवरून मोदी परिसरातील प्रेयसीवर सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उज्वल अरुण साबळे (वय २४, रा. कोर्ट कॉलनी, यलगुलवार कॉलेजजवळ, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.