Solapur : शरद पवार यांच्याकडून दिपक आबांना कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपकआबा साळुंखे-पाटील

Solapur : शरद पवार यांच्याकडून दिपक आबांना कानमंत्र

सांगोला : सध्या बदलत्या राजकीय समीकरणात सांगोला तालुक्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याच्या राजकारणात सांगोला तालुक्याची सर्वाधिक चर्चा सुरू असताना शिर्डी (जि. अहमदनगर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंथन शिबिर पार पडल्यानंतर थेट रुग्णालयातून शिबिरासाठी आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे हे चिंतन शिबिर मोठे चर्चेचे झाले आहे. शिबिर संपवून पुन्हा रुग्णालयात जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना कानमंत्र दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी सांगोला तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.

रुग्णालयातून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देऊनही खास पक्षाच्या शिबिरासाठी आलेल्या खा. शरद पवार यांनी पुन्हा रुग्णालयात जात असताना जवळ बोलावून दिपकआबा साळुंखे पाटील यांना नेमके काय सांगितले..? याबाबत आता सांगोला तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून तर्क वितर्क लढविले जात आहेत. गेल्याच महिन्यात खा. शरदचंद्र पवार यांचा नियोजित सोलापूर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द झाला होता. या दौऱ्यात ते माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या जवळा (ता. सांगोला) येथील घरी भेट देणार होते व बार्शी येथेही त्यांचा एक नियोजित कार्यक्रम होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना उपचारासाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सक्त विश्रांतीचा सल्ला दिला असताना खा. शरद पवार यांनी पदाधिकारी यांच्या शिर्डी येथील शिबिरास उपस्थिती लावून मार्गदर्शन केले.

हे शिबीर संपून जाताना दीपक साळुंखे-पाटील यांना बोलवून कानमंत्र देताना व्हिडिओ सांगोला तालुक्यात सध्या चर्चेचा विषय सुरू आहे. या व्हिडिओ विषयी दीपक साळुंखे पाटील यांना विचारले असता 'सध्या मी कामात असून याविषयी सविस्तर बोलेन असे त्यांनी आवर्जून सांगितले.