Solapur : मंगळवेढ्याच्या प्रांता विरोधात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग

Solapur : मंगळवेढ्याच्या प्रांता विरोधात बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

मंगळवेढा : येथील उपविभागीय अधिकारीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्यावतीने मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान,आंदोलकांनी निवेदन स्विकारण्यास वरिष्ठ महसूल अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्याने काही काळ येथील वातावरण गंभीर बनले.

बेअरर चेकव्दारे वाजवीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या इंडसलॅन्ड बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर व त्यांचे वर्ग कर्मचारी सुरज नळे यांच्या नामे व बेनामी संपत्तीची खाते चौकशी करण्यात यावी काझी बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी

नवीन संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांना तात्काळ नोटीसा देण्यात यावेत खोटे प्रतिज्ञापत्र करून तहसीलदार मंगळवेढा यांच्या पर्यायाने महाराष्ट्र शासनाची प्रश्न उप करणाऱ्या सुनिता ज्ञानू डांगे रा. शेलेवाडी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा हाजापूर येथील पारधी समाजातील व्यक्तींना त्वरित जातीचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता.जवळपास महामार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद राहिल्याने दोन्ही बाजूला लांबलचक वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

भर उन्हात आंदोलनकर्ते सिमेंट रस्त्यावर बसून होते.आंदोलनकर्त्यानी महसूलचे सोलापूर येथील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्विकारण्यास आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भुमिका घेतल्याने हे आंदोलन लांबत जात असल्याने उभ्या असलेल्या वाहनचालकांनी एकाच वेळी हॉर्न वाजवून गोंगाट चालू केल्याने परिस्थिती गंभीर बनत जात असल्याचे पाहून उपस्थित पोलिसांनी सर्वाना शांत केले.

निवेदन स्विकारण्यास शहर सज्जाचे तलाठी आले आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांवर तुम्ही कारवाई करणार का असा सवाल करून निवेदन देण्यास साफ नकार दिला.परिस्थिती चिघळत जात असल्याचे पाहून मंडलाधिकारी साळुंखे यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाध्यक्ष संजय गेजगे,डी.के.साखरे,समाधान हेंबाडे,शिवाजी जावीर,सिद्रराया माळी,येताळा खरबडे,रमेश शिंदे,दिपक ऐवळे यांचेसह विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.