
सोलापूर : येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चांगल्या मार्काने ‘एमबीबीएस’ची पदवी प्राप्त केलेल्या आदित्य नाम्बियार याने नशेत दोन्ही हातांची नस कापून घेतली. त्यानंतर बाथरूममध्ये जाऊन त्याने स्वत:चा गळा चिरून घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले आहे.